आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- प्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरानच्या पर्वतरांगांवर धावणाऱ्या टॉयट्रेनच्या पर्यटकांना आता वातानुकूलित (एसी) कोचमधून प्रवासाची साेय हाेणार अाहे. कुर्डुवाडी येथील वर्कशॉपमध्ये अाठ दिवसांत या एसी कोचची निर्मिती झाली असून दाेन दिवसांत ताे माथेरानला पाठवला जाईल. प्रायोगिक तत्त्वावर सध्या एकाच रेकला हा डबा जोडण्यात येणार आहे. त्याला चांगला प्रतिसाद लाभला तर अन्य रेकसाठीदेखील एसी कोच तयार केला जाईल.
या एका डब्यासाठी सुमारे आठ ते दहा लाखांचा खर्च आला. काही दिवसांपासून माथेरानच्या रेल्वेसाठी एसी कोच असावा याबाबत विचार सुरू होता. मध्य रेल्वेने एसी कोच तयार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एक डबा कुर्डुवाडी येथे आणण्यात आला. या डब्यांचे नूतनीकरण करण्यात आले तसेच वातानुकूलित यंत्रणेसह पर्यटकांचे लक्ष वेधण्यासाठी विलम रॅपिंग (आकर्षक स्टिकर्स ) डब्यावर चिकटवण्यात आले. या डब्यात १६ प्रवासी आसन क्षमता आहे. तसेच डब्यात जंगल सफरीचे आकर्षक स्टिकर्सही लावण्यात आले, अशी माहिती साेलापूरचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक व्ही. के. नागर यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.