आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रिज, वॉशिंग मशीन, कंडिशनर महागणार; मोदी सरकारने 19 वस्‍तूंवरील कस्‍टम ड्यूटी वाढवली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - क्रेंद सरकारने बुधवारी 19 वस्‍तूंवरील कस्‍टम ड्यूटी वाढवण्‍याचा निर्णय घेतला आहे. यामुळे फ्रिज, एअर कंडिशनर आणि वॉशिंग मशीन महागणार आहेत. अत्‍यावश्‍यक नसणा-या वस्‍तूंची आयात कमी करण्‍यासाठी आणि चालू खात्‍यातील तूट कमी करण्‍यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारने प्रथमच एव्हिएशन टर्बाइन फ्लूवरही कस्‍टम ड्यूटी लावली आहे. यामुळे यापुढे हवाई प्रवासही महागण्‍याची शक्‍यता आहे.


बुधवार रात्रीपासून हा निर्णय लागू होणार आहे. ज्‍या 19 वस्‍तूंवरील कस्‍टम ड्यूटी वाढवण्‍यात आली आहे, 2017-18मध्‍ये त्‍यांना आयात करण्‍यासाठी 86 हजार कोटी रुपये खर्च करण्‍यात आले होते.


चालू खात्‍यातील तूट कमी करा, सरकारचे निर्देश
ढासळता रूपया आणि वेगाने देशाबाहेर चालेले विदेशी चलन या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी यांनी मागील आठवड्यात उच्‍चस्‍तरीय बैठक बोलावली होती. बैठकीत चालू खात्‍यातील तूट कमी करण्‍यासाठी आयात कमी करण्‍याचे निर्देश मोदींनी दिले होते.

 

उत्पादन आधीची कस्टम ड्यूटी आताची कस्टम ड्यूटी
एअर कंडीशनर 10% 20%
रेफ्रिजरेटर 10% 20%
वॉशिंग मशीन 10% 20%
एअर कंडीशनर आणि रेफ्रिजरेटचे कम्प्रेसर 7.5% 10%
स्पीकर 10% 15%
फुटवेअर 20% 25%
कार टायर 10% 15%
नॉन इंडस्ट्रियल डायमंड, कट आणि पॉलिश्ड डायमंड 5% 7.5%
हाफ कट, तुटलेले डायमंड, सेमी प्रोसेस्ड 5% 7.5%
लैब ग्रोन डायमंड 5% 7.5%
ज्वेलरी, ज्वेलरीचे भाग 15% 20%
सोन्‍या-चांदीच्‍या वस्‍तू 15% 20%
प्लास्टिक चे बाथ, शॉवर बाथ, सिंक, वॉश बेसिन इत्यादि 10% 15%
प्लास्टिकचे कंटेनर, बॉक्स, बॉटल्‍स 10% 15%
प्लास्टिकचे किचन आणि या किचनचे सामान 10% 15%
प्लास्टिकच्‍या बांगड्या, मनके, प्लास्टिक स्टेशनरी, मूर्तीं, फर्नीचचे फिटिंग, सजावटीचे सामान 10% 15%
बॉक्‍स, सूटकेस, एग्झीक्यूटिव केस, ब्रीफकेस, ट्रॅवल बॅग आणि इतर बॅग्‍स 10% 15
एव्हिएशन टर्बाइन फ्यूल 0 5%

 

बातम्या आणखी आहेत...