आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युजर्सच्या डेटापर्यंत अप्लिकेशनद्वारे पोहोच; शुल्क आकारणीच्या विचारात होते फेसबुक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅन फ्रान्सिस्को -  आपल्या सोशल नेटवर्कवर डेटा प्राप्त करण्यासाठी अॅप्लिकेशन देणाऱ्यांकडून शुल्क आकारणी करण्याचा विचार केला होता, अशी माहिती फेसबुकने दिली आहे. असे असले तरी फेसबुकने आतापर्यंत कोणाला डेटा विक्री केला नसल्याचे म्हटले आहे. 


फेसबुकने बुधवारी हा खुलासा केला. फेसबुकचा रस युजरच्या खासगी आयुष्याच्या सुरक्षेऐवजी पैसा कमावण्यात जास्त असल्याचा आरोप आहे.सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकमध्ये डेव्हलपर प्लॅटफॉर्म व प्रोग्रामचे संचालक कॉन्स्टेटिनोस पॅपामिल्टियाडिस यांनी उत्तरात सांगितले की, फेसबुकने कोणालाही डेटा कधी विकला नसल्याचे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. आमचे एपीआय कायम खुले आहे व त्याच्या वापरासाठी आम्हाला थेट किंवा जाहिरात स्वरूपात कधी डेव्हलपर्सना पैसे देण्याची गरज 
भासली नाही.  

बातम्या आणखी आहेत...