आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस फाडून मधोमध घुसले टँकर, पाठीमागून क्रूझर सुद्धा धडकली; तिहेरी अपघातात 8 जण ठार

एका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्र-गुजरात सीमेवर सोनगडजवळ प्रवाशांवर काळाचा घाला
  • राँग साइडने आलेल्या टँकरने बसला समोरून तर क्रुझर पाठीमागून दिली धडक

नवापूर - महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेवरील सोनगडजवळ पोखरण गावात पेट्राेल पंपावरून डिझेल भरून विरुद्ध दिशेने धावणाऱ्या डांबरच्या टँकरने समोरून येणाऱ्या गुजरातच्या एसटी बसला चिरडले. याच वेळी मागून येणारी क्रुझरही बसवर धडकली. या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून, २७ जण जखमी झाले. मृतांमध्ये ७ पुरुष तर १ महिलेचा समावेश आहे. हा अपघात सोमवारी दुपारी ४.३० वाजता झाला. नागपूर-सुरत महामार्गावरील गुजरात राज्याच्या हद्दीत सोनगडनजीकच्या पाेखरण येथे टँकर डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेला होता. डिझेल भरून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जात असताना टँकरने कुशलगड-सुरत-उकई बसला चिरडले. याच वेळी मागून सुरत येथून दशक्रिया विधी करून मालेगाव येथे परणारी क्रुझरने बसला मागून धडक दिली. बस एका बाजूने अर्ध्यापर्यंत कापली गेल्याने बसचालक हसमुख रामूभाई गमीत यांच्यासह सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर उपचारादरम्यान दाेघांचा मृत्यू झाला. या क्रुझरमध्ये गुगलवाडा (ता. मालेगाव) येथील १६ प्रवासी हाेते. त्यातील तिघांचा मृत्यू झाला अाहे. अपघातामुळे नागपूर-सुरत महामार्गावर रक्ताचा सडा पडला होता. अपघाताची माहिती मिळताच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना बसमधून बाहेर काढले. त्यानंतर १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका बोलावून व्यारा-सोनगड सरकारी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. अपघातात यांचा झाला मृत्यू

अशोक आत्माराम निकम (रा. गोगलबार, ता. मालेगाव), समाधान अशोक सिंग (वय ५०, रा. वानपुरी, जि. पुणे), परबत देवचंद निकम (रा. गोगलबार, मालेगाव), विश्वास रतन निकम (रा. गोगलबार, मालेगाव), हसमुखभाई रामूभाई गमीत (उंचमाला, व्यारा) तर तीन जण अनोळखी अाहे.