Accident / पुणे-बंगळुरू महामार्गावर खासगी बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक; 6 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी

साताराजवळ ट्रक आणि खासगी बसमध्ये जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू

Sep 12,2019 11:14:11 AM IST

सातारा - पुणे बंगलोर महामार्गावरील सातारा तालुक्याच्या हद्दीत डी मार्ट जवळ मुंबईकडून बेळगावकडे जाणाऱ्या ट्रॅव्हलसने समोर चाललेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत 6 जणांचा मृत्यू झाला असून 15 ते 20 जण जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास मुंबईवरून बेळगावकडे निघालेल्या KA 01 AF 9506 या एसआरएस कंपनीच्या ट्रॅव्हल्सने पुढे चाललेल्या ट्रकला (MH 43 BP 3127) जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रॅव्हल्सचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातातील जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

X