आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Accident : पुणे-सोलपूर महामार्गावर गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला डंपरची जोरदार धडक; सुदैवाने बचावले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - प्रसिद्ध लोकगायक आनंद शिंदे यांच्या गाडीला इंदापूरजवळ पहाटे दोन वाजता अपघात झाला आहे. ते मुंबईहून इंदापूरमार्गे सांगोल्याला जात होते. दरम्यान पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ वरकुटे गावाजवळ डंपरने त्याच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात आनंद शिंदेंच्या पायाला दुखापत झाली आहे. 
 
या अपघातात आनंद शिंदे बचावले असून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. आनंद शिंदेंची प्रकृती स्थिर आहे. या धडकेत शिंदे यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. इंदापूरातील डॉ अविनाश पाणबुडे यांच्या खासगी दवाखान्यात प्रथमोपचार करुन शिंदे सांगोल्याकडे मार्गस्थ झाले. गाडीत आनंद शिंदे यांच्यासोबत आणखी चार सहप्रवाशी असल्याचे समजते.
 
 

बातम्या आणखी आहेत...