आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅपेरिक्षा-ट्रकची धडक, तीन जण गंभीर जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


भुसावळ - गुरूवारी सकाळी ७.३० वाजता कुऱ्हे पानाचे गावाजवळील सातवड धरणाजवळ अॅपेरिक्षा व ट्रकची धडक झाली. अपघातात जामनेरकडून भुसावळकडे येणाऱ्या अॅपेरिक्षातील तीन जण जखमी झाले. जखमींना तात्काळ जामनेर ग्रामीण रूग्णालयात नेण्यात अाले. याप्रकरणी वाहनधारकांमध्ये तडजोड झाल्याने पोलिसात गुन्हा दाखल झाला नाही. 

 

जामनेर येथून कपाशी खरेदी करण्यासाठी निघालेली मालवाहू अॅपेरिक्षाला (क्र.एम.एच.१९-बी.एम.५३७९) भुसावळकडून जामनेरकडे येणाऱ्या ट्रकने (एमपी.०९-एच.जी.८०१०) धडक दिली. अपघातात अॅपेरिक्षातील तीन मजूर जखमी झाले. मार्गावरील अन्य वाहनधारकांनी जखमींना दुसऱ्या वाहनाने जामनेरला हलवले. अपघातात अॅपेरिक्षाचेही नुकसान झाले. हवालदार हर्षवर्धन सपकाळे अाणि पाेलिस कर्मचारी तुषार पाटील यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी तालुका पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याचे पाेलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी बोलताना सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...