आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एरंडोलनजीक राष्ट्रीय महामार्गावर काळीपिवळीवर आदळला ट्रक, भीषण अपघातात 5 जण जागीच ठार तर 7 जखमी

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • ट्रकचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे सुटले नियंत्रण
  • काळीपिवळीतील 15 प्रवाशांपैकी 8 जणांचा मृत्यू

एरंडोल - एरंडोलनजीक राष्ट्रीय महामार्गावर ट्रक व काळीपिवळीच्या भीषण अपघातात काळीपिवळीतील 8 प्रवासी जागीच ठार झाले. तर 7 जण जखमी झाले आहेत. सोमवारी (23 डिसेंबर) रोजी दुपारी 3.45 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना एरंडोल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला.   

प्राप्त माहितीनुसार, एरंडोलकडून जळगावकडे भरभाव वेगाने येणाऱ्या ट्रकचा (क्र.एम.एच.15 जी.8474) स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाने ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक समोरून येणाऱ्या काळीपिवळीवर (एम.एच.19 वाय 5207) वर आदळला. काळीपिवळी वाहनातील 15 प्रवाशांपैकी 8 प्रवासी ठार झाले असून इतर 7 जण झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये 3 एरंडोल येथील तर एक उत्राण गावातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली. मृतांमध्ये निवृत्ती प्रभाकर वंजारी (वय 45, रा.एरंडोल), प्रसन्न निवृत्ती वंजारी (वय 10, रा.एरंडोल), परमेश्वर नाना माळी (वय 23, रा.एरंडोल), पिंटू सोनार (वय 45, रा.एरंडोल - काळीपिवळी चालक),  काशीनाथ शंकर पाटील (वय 50, रा.चिमणपुरी पिंपळे, ता.अमळनेर), भानुदास जाधव (वय 55, रा.एरंडोल) यांचा समावेश असून एक 30 वर्षीय महिला व 25 वर्षीय मुलगा अशा दोन मृतदेहांची ओळख पटलेली नाही.अपघातानंतर ट्रकचालक पसार 


अपघातानंतर चार जखमींना जळगाव येथे रवाना करण्यात आले. तर सुमारे सहा वर्षांची मुलगी बचावली आहे. तिचे नाव समोर आले नाही. नाशिक येथील ट्रकचालक अपघातानंतर पसार झाला. अपघात झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर सुमारे 15 मिनिटे वाहतूक कोंडी झाली होती. एरंडोलचे पोलिस निरीक्षण अरुण हजारे यांच्यासह पोलिसांनी वाहतूक कोंडी फोडून मृतदेह एरंडोल ग्रामीण रुग्णालय व जखमींना जळगाव येथे रवाना केले.