आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Accident Between Two Bikes Because Of Riding Wrong Side

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राँगसाइडमुळे दुचाकींची समोरासमोर धडक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज -  घाणेगावच्या दिशेने राँगसाइड जाणाऱ्या दोन दुचाकीचा समोरासमाेर धडकून अपघात झाला. यात दोन्ही दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले. सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यासंदर्भात प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता वाहनधारक जीव धोक्यात घालून राँगसाइड मार्गाचा सर्रास वापर करत असल्याचे निदर्शनास आले. 

 

२ जानेवारी रोजी घाणेगाव शिवारातील कंपनीमध्ये काम करणाऱ्या दोन महिलांसह स्वतः कामगार दुचाकीवरून ट्रिपलसीट राँगसाइड घाणेगावच्या दिशेने जात  होता. समोरून आलेल्या दुचाकीवर राँगसाइड जाणारी दुचाकी आदळून झालेल्या अपघातामध्ये दोन्ही दुचाकीस्वारांचा उपचारादराम्यान मृत्यू झाला, तर उर्वरित तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेला अवघे चार दिवस उलटत नाहीत तोच पुन्हा याच मार्गावर राँगसाइड घाणेगावच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर दुचाकींचा समोरासमोर अपघात होऊन दोन्ही दुचाकीस्वार व मागे बसणारा असे तिघे किरकोळ जखमी झाल्याची घटना ६ जानेवारी रोजी सायंकाळी घडली. याबाबत दैनिक दिव्य मराठीने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन अधिक माहिती घेतली असता असे निदर्शनास आले की, या मार्गावर दर दोन दिवसाला किमान एक अपघात निश्चित होतो. 


राँगसाइड रस्त्याचा वापर 

झांबड चौकापासून पुढे घाणेगाव शिवारातून ऑटोक्लस्टरच्या दिशेने जाणाऱ्या प्रशस्त मुख्य मार्गावर एमआयडीसी प्रशासनाकडून दुभाजक टाकण्यात आले आहेत. नव्यानेच तयार करण्यात आलेल्या गुळगुळीत डांबरी रस्त्यावर सुसाट वाहने धावत आहेत. मात्र, दुसरीकडे श्रीसाई उद्योगनगरी, घाणेगाव शिवारातील गट नंबरच्या दिशेने जाणाऱ्या व येणाऱ्या तसेच सदरील तिन्ही रस्त्यांच्या बाजूला असणाऱ्या नामांकित कंपनीतून ये-जा करणाऱ्या कामगारांना घाणेगाव, जोगेश्वरी तसेच ऑटोक्लस्टरच्या दिशेने जाण्यासाठी नियमानुसार डाव्या बाजूच्या रस्त्याचा वापर करत काही अंतरावर पुढे जाऊन वळण घेऊन पुन्हा परत यावे लागते. मात्र, हेच अंतर टाळून वाहनधारक व पादचारी सर्रास राँगसाइड रस्त्याचा वापर करून जाणे पसंत करतात. हा शॉर्टकट मार्ग वाहनधारकांना थेट मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचवत असल्याचे चार दिवसांपूर्वीच अनेकांनी अनुभवले.