आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या वाढदिवसादिवशी साई देवदर्शनाहुन परतताना अपघात; कॅनलमध्ये कोसळली कार, पत्नी ठार

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

करमाळा - शिर्डी देवदर्शनाहुन परतत असताना कार गाडीचा अपघातात वाढदिवसा दिवशीच पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पती जखमी झाला असून करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. हा अपघात अहमदनगर टेंभुर्णी रस्त्यावर कुंभेज फाटा येथे कॅनल मध्ये गाडी पडून मंगळवारी सायंकाळी सातच्या दरम्यान झाला आहे.
स्वाती साईकुमार रेड्डी जक्का (वय 28) यांचा जागीच मृत्यू तर साईकुमार सतीश रेड्डी जक्का (वय 29) रा. मोतीलाल नगर क्रमांक 3, एमजी रोड, जैन हॉस्पिटल जवळ, गोरेगाव, वेस्ट मुंबई मुळ बंगळुरु हे जखमी आहेत. रस्त्याचा अंदाज न आल्याने कॅनॉलमध्ये पडली कार 


याबाबत अधिक माहिती अशी की, बंगळुरु येथील साई कुमार व स्वाती या दाम्पत्याचे मे 2019 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर स्वातीचा पहिला वाढदिवस शिर्डी येथे देवदर्शन करून या दांपत्याला साजरा करण्याचा असल्याने दोघेही (कार क्रमांक GJ 27 BE7165) शिर्डीला दर्शनासाठी गेले होते. मंगळवारी दुपारी तीन वाजता दर्शन आटपून ते आपल्या मूळगावी बंगळुरु येथे जाण्यासाठी निघाले. सायंकाळी सातच्या सुमारास रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडी थेट टेंभुर्णी रस्त्यावरील कुंभेज फाट्याजवळील कॅनलमध्ये जाऊन पडली. यावेळी एस क्रॉस ही कार गाडी मधील एअरबॅग उघडल्यामुळे पती साई कुमार हा साधारण जखमी झाला आहे. परंतु पत्नी स्वातीस छाती आणि डोक्यावर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर उपस्थित नागरिक व पोलिसांच्या मदतीने साईकुमार व स्वाती यांना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी स्वाती हीस डॉक्टर महेश भोसले यांनी मृत घोषित केले. तर साई कुमार यांच्यावर उपचार सुरू आहेत.  अहमदनगर-टेंभुर्णी मार्गावरील रस्त्याच्या अर्धवट कामामुळे अनेक  अपघात  
 
अहमदनगर टेंभुर्णी मार्गावर रस्त्याचे अर्धवट काम राहिल्यामुळे अनेकदा असे अपघात झालेले आहेत. यापूर्वीही जळगावचे प्रवासी जात असताना मध्यरात्री याकॅनल मध्ये एक कार गाडी पडल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर तात्पुरती स्वरुपाची डागडुजी करण्यात आली होती. पण ती पुरेशी नसल्याचे या अपघातावरुन दिसत आहे. यावेळची ही परिस्थिती तशीच असून रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व तो थेट सत्तर फुट खोल कॅनल मध्ये जाऊन पडला.

 

बातम्या आणखी आहेत...