Accident / Accident : इंद्रायणी नदीत कार कोसळली; एक जण बचावला, दोघे बेपत्ता

कारवरील ताबा सुटल्याने पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली कार

दिव्य मराठी

Aug 02,2019 07:56:00 AM IST

रायगड - मावळ तालुक्यातील कान्हे टाकवे मार्गावर इंद्रायणी नदीच्या पुलावरून कार नदीत कोसळली. कारमध्ये असलेल्या तिघांपैकी एक जण बाहेर पडला, तर दोघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.


गुरुवारी दुपारी ही घटना घडली.अक्षय संजय ढगे (२०, टाकवे बु., ता. मावळ) संकेत नंदू असवले (२०) अक्षय मनोहर जगताप (२०, रा. सदर) हे तिघे जण स्विफ्ट कारमधून प्रवास करत होते. संकेत असवले हा कार चालवत होता. दरम्यान, इंद्रायणी नदीच्या पुलावरून जात असताना अचानक संकेतचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे अनियंत्रित झालेली कार थेट पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली आणि काही कळायच्या आतच कठडा तोडून थेट नदीत कोसळली. दरम्यान, नदीत प्रवाहासोबत वाहणाऱ्या कारमधून अक्षय ढगेने स्वत:ला कसबसे मुक्त केले. त्याला पोहणे येत असल्याने तो तिरावर आला. परंतु, संकेत असवले आणि अक्षय जगताप मात्र आतच अडकून होते. मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू असल्याने नदी सध्या काठोकाठ भरून वाहत आहे. त्यामुळे कारमध्ये वाहून गेलेल्या दोघांनाही वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न सुरू आहेत. गुरुवारी उशीरा रात्रीपर्यंत त्यांना वाचवण्यात यश आले नव्हते.

X