आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाट धुक्यामुळे अंबाला-चंडीगड मार्गावर भीषण अपघात, 12 गाड्यांची एकमेकांना धडक; 2 जण ठार तर 12 जण जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


डेराबस्सी (पंजाब) : अंबाला-चंडीगड महामार्गावर डप्पर टोल प्लाझाजवळ घोलूमाजरामध्ये 12 वाहनांचा एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. 1 जानेवारी रोजी सकाळीच धुक्यामुळे हो अपघात झाला. 300 मीटर परिसरात झालेल्या या अपघातात एक अल्टो कारमधील आई आणि मुलीचा जागेवरच मृत्यू झाला. तर 9 महिलांसमवेत 12 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना डेराबस्सी येथील सिव्हील तसेच खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यांमध्ये 3 महिला आणि एका मुलीची प्रकृती गंभीर आहे. 


कारचा झाला चेंदामेंदा

पंचकूला येथील संजय कुमार आपल्या परिवारासोबत कुरुक्षेत्रात येथे राहणाऱ्या मोठ्या भावाकडे गेले होते. मंगलवारी सकाळी घरी परतत होते. वाटेत खूप दाट धुके होते. त्यांच्यासमोर एक वाहन उभे होते. त्याला पाहून त्यांनी गाडी थांबविली. नेमके काय घडले हे पाहण्यासाठी ते खाली उतरून पुढे गेले. काही सेंकदाने परत आल्यानंतर पत्नी आणि मुलीची अवस्था पाहून त्यांच्या पायाखालची जखमी सरकली. एका मिनी बसने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली होती. त्यांच्या कारसमोर उभे असलेले वाहन आणि बस दोघांच्या मध्ये कारचा चेंदामेंदा झाला होता. अथक प्रयत्नांनंतर कारला तोडून पत्नी आणि मुलीला बाहेर काढून रूग्णालयात दाखल केले असाता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. 


यामुळे झाला हा भीषण अपघात 

दुसरीकडे राजिंदर सैनी आपल्या परिवारासोबत अंबाला येथे नववर्षानिमित्त दर्शनासाठी गेले होते. तेथून परत येताना धुक्यात उभी असलेले कंटेनर पाहून त्यांनीही ब्रेक लावला. दरम्यान रोडवेज बसने त्यांच्या कारने पाठीमागू जोरदार धडक दिली. त्यामुळे त्यांची कार बस आणि कंटेनरमध्ये फसली. लोकांनी दरवाजे तोडून जखमींना बाहेर काढून रूग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यावरील 300 मीटर अंतरावर तीन वेगवेगळ्या ठिकाणी गाड्यांची एकमेकांना धडक बसून अपघात झाले आहे. संजयने दिलेल्या तक्रारीवरून मिनी बस चालकाविरूद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

 

इंडिकेटर आणि ब्लिंकरही होते बंद 

सदर अपघात सकाळी 8 वाजता चंडीगडकडे जाताना दप्पर टोल प्लाझा पार केल्यानंतर झाला. जेसीबीएल कंपनीचे एका कंटेनर डिवायडरच्या उजव्या बाजूला थांबलेल्या एका ट्रालीवर जाऊन भिडला. कंटेनर चालकाच्या मते ट्रालीचे इंडिकेटर आणि ब्लिंकर दोन्हीही बंद होते. यामुळे धुक्यात ते वाहन जवळ गेल्यावरच दिसले. ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत उशीर झाला होता. कंटेनर त्या ट्रालीवर जाऊऩ भिडला. त्यानंतर कंटेनरच्या पाठीमागे असलेली एक बस देखील कंटेनर वर धडकली. आणि बघता बघता एकापाठोपाठ एक अनेक वाहने एकमेकांवर धडकत गेले आणि हा भीषण हा अपघात झाला.