आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात : आयशरची जीपला धडक; मुलगी ठार, २ जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड - भरधाव आयशरने दिलेल्या धडकेत बोलेराे वाहनातील एक मुलगी ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना अंबड रोडवरील हरतखेडा पाटीजवळ शुक्रवारी सकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. नेहा गणेश जाधव (७, सिंदखेड, ता. घनसावंगी) असे मृत मुलीचे नाव आहे. गणेश बंडू जाधव, मनीषा गणेश जाधव अशी जखमींची नावे आहेत.

 
या प्रकरणी बोलेरोचालकाने दिलेल्या फिर्यादीवरून आयशर वाहनचालकाविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना येथून बोलेरो (एमएच २१ व्ही ९२६१) चालक महेश बाबासाहेब शिंदे (२१) हा त्याच्या बोलेरो वाहनातून कुंभार पिंपळगावकडे निघाला होता. दरम्यान, जालना बसस्थानकावर त्यांच्या ओळखीचे घनसावंगी तालुक्यातील सिंदखेड येथील राहणारे गणेश बंडू जाधव (३८) हे त्यांची पत्नी मनीषा (३४) व त्यांच्या तीन मुली सावडण्याच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी जालना बसस्थानकात उभे होते. त्यांना ओळखीची असलेली बोलेरो गाडी दिसल्यामुळे त्यांनी सावडण्याचा कार्यक्रम असल्याने आम्हाला लवकर जाणे आहे व आम्हाला गाड्या लागत नाहीत, म्हणून चालक महेश शिंदे यांना सांगितले. यानंतर शिंदे यांनी त्यांना वाहनात बसवले. यानंतर अंबडकडे जात असताना हरतखेडा पाटीच्या समोर रोडवर अंबडकडून जालन्याकडे जाणाऱ्या आयशर (एमएच २४ एयू २०४५)  चालकाने त्याच्या ताब्यातील आयशर भरधाव व निष्काळजीपणाने चालवून बोलेरोला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात बोलेरोमधील नेहा गणेश जाधव हिचा मृत्यू झाला. गणेश बंडू जाधव यांच्या डोक्याला मार लागला. यासह इतरांनाही किरकोळ मार लागला आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात बोलेरोचालक महेश बाबासाहेब शिंदे (लालवाडी, ता.अंबड) यांच्या फिर्यादीवरून आयशरचालक (नाव-गाव माहीत नाही) याच्याविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास बीट जमादार एम. बी. वाघ हे करीत आहेत.

 

जखमींना अंबडच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवले
या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे जमादार पी. टी. चव्हाण, एम. बी. वाघ यांनी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. परिसरातील लोकांच्या मदतीने अपघातातील लोकांना उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे उपचारासाठी दाखल केले. गंभीर जखमी असलेले गणेश जाधव, नेहा जाधव यांना जालना येथील खासगी दवाखान्यात हलवण्यात आलेले आहे.