आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाला भीषण अपघात, वाहनाचा चुराडा, चालक गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- रावेरचे आमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाला भीषण अपघात झाला. अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघात मंगळवारी मध्यरात्री भुसावळ -फैजपूर रस्त्यावर भोरटेकजवळ झाला. आमदार जावळे यांच्या वाहनाचा अक्षरश: चुराडा झाला आहे. आमदार जावळे यांना भुसावळ रेल्वे स्टेशनवर सोडून चालक दीपक कोळी फैजपूरकडे निघाला होता. समोरून येणार्‍या भरधाव ट्रकने धडक दिली.

 

मिळालेली माहिती अशी की, चालक दीपक कोळी याने आमदार जावळे यांना मंगळवारी रात्री भुसावळ रेल्वे स्टेशनला सोडले. नंतर तो भालोदकडे येण्यास निघाला असता भोरटेकजवळ फैजपूरकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात चालक कोळी  गंभीर जखमी झाले आहेत. वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच भुसावळचे नगरसेवक परिक्षीत बऱ्हाटे, प्रा. जतीन मेढे, अविनाश कोळी, ज्ञानेश्वर कोळी, किशाेर कोळी, महेंद्र कोळी, सागर कोळी, भगवान कोळी व पाडळसेचे पोलिस पाटील सुरेश खैरनार  यांनी घटनास्थळी धाव घेतली. दीपक कोळी याला तातडीने रुग्णालयात हलविले.


अन् आमदार जावळे मुंबईला गेलच नाही..

 

आमदार हरीभाऊ जावळे हे सपत्नीक मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. परंतु चालकाच्या अपघाताची माहिती मिळताच त्यांना मुंबईला जाणे रद्द केले. भुसावळचे आमदार राजु भोळे यांच्या वाहनाने थेट रूग्णालयात पोहोचले. चालकाच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. दीपक कोळी यांची प्रकृती स्थीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... आमदार हरीभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाच्या अपघाताची भीषणता दाखविणारे फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...