आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Accident In Jammu And Kashmir: Bus Collapses In Valley, 24 Passengers Die And 7 Injured

जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण सुटल्याने खोल दरीत कोसळली बस; 33 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये भीषण बस अपघाताचे वृत्त सोमवारी समोर आले आहे. सोमवारी सकाळी घडलेल्या या अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहेत. प्राथमिक वृत्तांमध्ये 24 जणांच्या मृत्यूचे वृत्त समोर येत होते. परंतु, मृतांचा संख्या वाढत गेली. चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला असे सांगितले जात आहे.

 

 

 

 

 

 

जम्मूचे वरिष्ठ पोलिस अधिकारी एमके सिन्हा यांनी सांगितल्याप्रमाणे, बसमध्ये जवळपास 55 जण प्रवास करत होते. सिर्गवाडी परिसरात असताना सोमवारी सकाळी 7.30 च्या सुमारास बसवरील नियंत्रण सुटले आणि खोल दरीत जाऊन कोसळली. या घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जम्मू-काश्मीर माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, मुख्यमंत्री महबूबा मुफ्तींसह अनेकांनी शोक व्यक्त केला. तर दुसरीकडे, हिमाचल प्रदेशात सुद्धा एका शाळेची बस दरीत कोसळल्याने 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.