आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिप्परने तीन दुचाकींना ठोकरले, चार जणांचा मृत्यू, लातूर-बार्शी मार्गावरील घटना, दोघे जखमी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - लातूर-बार्शी रस्त्यावर साखरा पाटीनजीक एका भरधाव टिप्परने एका पाठोपाठ तीन दुचाकींना उडवले. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले आहेत. 
पोलिस आणि प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार लातूर बार्शी रस्त्यावरील साखरा पाटीनजीक सोमवारी दुपारी एक टिप्पर लातूरहून मुरूडकडे जात होते. त्याचा चालक बहुधा मद्यधुंद अवस्थेत होता. टिप्परचा वेग जास्त असल्यामुळे चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले. त्याच दरम्यान काही दुचाकी लातूरकडे येत होत्या. या भरधाव आणि अनियंत्रत टिप्परने एका पाठोपाठ तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. त्यामध्ये नागनाथ येलगट्टे (३०, रा.चाटा बोपला ता. लातूर), शंकर बाबू काळे (२८), बुद्धघोष नामदेव पालके दोघेही (रा. येडशी जि. उस्मानाबाद) या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर प्रदीप पांडूरंग माळी(३१ रा.एकुर्गा, जि. लातूर) यांचा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. टिप्परचालक अपघातानंतर फरार झाला असून पोलिस त्याच्या मागावर आहेत. अपघातानंतर रस्त्यावर मोठी गर्दी जमून तणावही निर्माण झाला. 

बातम्या आणखी आहेत...