आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ: दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात, महिलांसह आठजण जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागाव (यवतमाळ) -  माहुर येथुन देवदर्शन करून परत येणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. अपघातात 3 महिला गंभीर जखमी झाल्‍या असून चारजण किरकोळ जखमी झाले आहेत. आज (सोमवार) संध्‍याकाळी ७ वाजेच्‍या सुमारास तालुक्यातील आंबोडा ते महागाव मार्गावर हा अपघात झाला.

 

अपघातात तालुक्यातील करंजखेड येथील शांताबाई ठाकरे, पार्वताबाई जाधव, कलाबाई भांगे, शशीकलाबाई भांगे, अनुसयाबाई भांगे, वाहन चालक योगेश ठाकरे यासह अन्य दोन महिला असे 8 भाविक जखमी झाले आहेत. ते माहुर येथे सोमवारी सकाळी ओमनी कारने (MH 29 AR 4128)ने दर्शनासाठी गेले होते. सायंकाळच्या सुमारास देवदर्शन करून परत येत असतांना नागपुर-तुळजापुर राष्ट्रीय महामार्गावरील आंबोडागावाजवळ असलेल्या पानवळ परिसरात भरधाव हार्वेस्टरने भाविकांच्या कारला समोरा समोर जबर धडक दिली.

 

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्‍थळी धाव घेत जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल केले. तीन महिलांची प्रकृती गंभीर असून चार महिला किरकोळ जखमी आहे.

 

बातम्या आणखी आहेत...