आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्मेटअभावी 2 मित्रांनी गमावले प्राण, दुभाजकाला दुचाकीची धडक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - भरधाव जाणाऱ्या दुचाकीने दुभाजकाला धडक दिल्याने झालेल्या गंभीर अपघातात दोन जीवलग मित्रांना जीव गमावला लागला. रविवारी (दि. २५) दुपारी दीडच्या सुमारास मायको सर्कलकडून त्र्यंबकनाक्याकडे जाताना हा अपघात घडला. या दोघांनी हेल्मेट घातले नसल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली असून हेल्मेट असते तर दोघांचा जीव वाचला असता, अशी चर्चा प्रत्यक्षदर्शी नागरिकांमध्ये होती. 

 

पोलिसांनी दिलेली माहिती व पोलिस हवालदार शेळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रोशन चंद्रकांत हिरे (२९ रा. बाजीरावनगर, तिडके कॉलनी) व प्रसाद भागवत शेरमाळे (२५, रा. डीजीपीनगर, अशोका मार्ग) दुचाकीने (एम.एच. १५ एफ पी ९८) जात असताना रस्त्याच्या दुभाजकाला जोरात धडक दिली. दोघे रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागला. नागरिकांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच दोघांना मृत घोषित करण्यात आले. डोक्यात हेल्मेट नसल्याने दोघांच्या डोक्यास गंभीर मार लागून त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा प्रत्यक्षदर्शी नागरिकांमध्ये होती. दोघांच्या शवविच्छेदन अहवालामध्ये मेंदूला गंभीर इजा झाल्याने मृत्यू झाल्याची नोंद आहे. पोलिसांनी हेल्मेटसक्तीसाठी सातत्याने मोहीम राबवत असून अलीकडेच कारवाई करत दंडही ठाेठावण्यात अाला. मात्र, बहुतांश वेळा कारवाई टाळण्यापुरतेच हेल्मेट वापरले जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...