आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवापूरमध्‍ये बस-दुधगाडीची समोरासमोर धडक; एकजण जागीच ठार, 8 गंभीर जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर (नंदुरबार) - तालुक्‍यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर दुध वाहतूक करणारी गाडी व बडोदा-अमळनेर बसची समोरासमोर धडक झाली. विसरवाडीजवळील अॅपल हॉटेल समोर सकाळी 11 वाजेच्‍या सुमारास हा भीषण अपघात झाला. यात दुधगाडी चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर बस मधील 8 प्रवासी गंभीररीत्‍या जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्‍याची भीती वर्तविली जात आहे.

 

गोदावरी कपंनीची दुधाची गाडी कोपरगावरहुन येत असताना राष्‍ट्रीय महामार्गावर गाडीला एसटी बसची धडक बसली. यादरम्‍यान दुधगाडीचा चालक वाहनामध्‍येच अडकल्‍याने त्‍याचा जागीच मृत्‍यू झाला. रमेश जऱ्हाड (45) असे गाडीचालकाचे नाव आहे. ते शिंगणापूर, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर येथील रहिवासी होते.

 

अपघातानंतर स्‍थानिक पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेत अपघातग्रस्‍तांना मदत केली. मात्र 108 रूग्‍णवाहिका वेळेवर न आल्‍याने जखमी प्रवाशांचे हाल झाले. जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे.


पुढील स्‍लाइडवर पाहा, या भीषण अपघाताचे फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...