Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Accident of the doctor going to Verul Council; One killed, 36 injured

वेरूळला परिषदेसाठी जाणाऱ्या डॉक्टरांच्या बसला अपघात; एक ठार, ३६ जखमी

प्रतिनिधी | Update - Sep 02, 2018, 12:07 PM IST

आैरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ येथे परिषदेसाठी चाललेल्या डॉक्टरांच्या लक्झरी बसचा शनिवारी अपघात झाला.

 • Accident of the doctor going to Verul Council; One killed, 36 injured

  नगर - आैरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ येथे परिषदेसाठी चाललेल्या डॉक्टरांच्या लक्झरी बसचा शनिवारी अपघात झाला. नगर-पुणे महामार्गावरील केडगाव बायपासजवळील हॉटेल नीलसमोर शनिवारी पहाटे चारच्या सुमारास कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याने ही घटना घडली. अपघातात बसचालक अल्ताफ खालीद हमद हा (३७, मुंबई) जागीच ठार झाला, तर ३६ डॉक्टर जखमी झाले आहेत. त्यात तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  मुंबई येथील टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, तसेच मुंबई व ठाणे येथील ४० डॉक्टर वेरूळ येथे परिषदेसाठी जात होते. एका खासगी लक्झरी बसने (डीएल, डी ०२८९) शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास ते मुंबई येथून निघाले. शनिवारी पहाटे ते नगर शहराजवळ आले असता त्यांच्या बसने समोरील कंटेनरला (सीजी, ०४ जेए २२५६) पाठीमागून धडक दिली. भरधाव वेगात असलेल्या बसचा या धडकेत चक्काचूर झाला. या वेळी बसमधील सर्व डाॅक्टर झोपेत होते. जोराचा आवाज झाल्याचे लक्षात येताच डॉक्टर जागे झाले. त्यानंतर बसमध्ये आरडाओरड सुरू झाली. बसमधील बहुतेकजण जखमी झाले होता. तोपर्यंत पोलिसांना या अपघाताची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात बसचा चालक जागीच ठार झाला, तर बसमधील ३६ डॉक्टर जखमी झाले. त्यात तिघांची प्रकृती गंभीर असून या सर्वांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी निखिल धर्मेंद्र कल्याणी (३५, पोर्णिमा ब्लॉक नं. १४, आरव्ही मेहता रोड, घाटकोपर, पूर्व मंुबई) यांच्या फिर्यादीवरून काेतवाली पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. जखमींची नावे पुढीलप्रमाणे आहेत. डॉ. अनिल टिबडेलवाल, डॉ. पुष्कर इंगळे, डॉ. जॉनी कार्लटन (तिघे गंभीर जखमी आहेत), दीपांजली अडूलकर, भाविन विसारिया, आशिष भांगे, स्वाती चुघ, हर्षिता, प्रिथी, मनीष मदाने, आस्फिया खान, त्रिरंजन बासू, दीपक कुमार, जाहिद मुलानी, सायोग डे, सचिता पाल, आकांक्षा अनुप, जिन्स मॅथ्यू, निष्ठा सेहरा, प्रशांत नायक, पल्लवी खुरूड, जिमी मंजली, प्राची सावंत, अजय शशीधरण, अनुजकुमार, सपर्पिता मोहंती, प्रारब्ध सिंग, अमरेंद्र कुमार, सुचिता पॉल, वेदांत मूर्ती, सागर गायकवाड, केतकी अडसूळ, उन्मेष मुखर्जी, कस्तुरी बरवा, उपासना सक्सेना, सचिन आनंद, जिफ्मी जोस, निशिता सेहरा, रवि शंकरदास.

  अपघातानंतर फरफटत गेली बस
  भरधाव वेगात असलेल्या लक्झरी बसने कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याने बसचा चक्काचूर झाला. अपघातानंतरही बस कंटेनरमध्येच अडकलेली होती. मात्र, आपल्या कंटेनरला पाठीमागून बसची धडक बसल्याचे कंटेनरचालकाच्या लक्षात आले नाही. त्यामुळे कंटेनरमध्ये अडकलेली बस काही अंतर तशीच फरफटत गेली. बसमधील डॉक्टरांची आरडाओरड एेकून चालकाने कंटेनर थांबवला, तेव्हा अपघात झाल्याचे कंटेनरचालकाच्या लक्षात आले.

  बसचा दरवाजाही उघडेना
  अपघातात चक्काचूर झालेल्या बसचा दरवाजा बंद झाला होता. बसमधील जखमी डॉक्टरांनी प्रयत्न करूनही हा दरवाजा उघडत नव्हता. बसच्या क्लिनरने संकटकालीन दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, तोही उघडला नाही. अथक प्रयत्नांनंतर बसचा मुख्य दरवाजा उघडला, त्यानंतर जखमी डॉक्टर खाली उतरले. अपघातात बसचालक स्टेअरिंगमध्ये अडकून जागीच ठार झाला. बसची धडक इतकी जोराची होती की बसचालकाचा पाय तुटून बाजूला पडला होता.

Trending