आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघातामध्ये तिघांचा मृत्यू, सातारा येथे मतदानासाठी जात होते 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुणे एक्स्प्रेसवेवर आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. कामशेत बोगदापासून काही अंतरावर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या खासगी बसने सर्विस लेनवर नादुरुस्त असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने या अपघातात बसमधील एकूण ३५ प्रवाशांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर सोळाजण गंभीर जखमी झाले आहेत. सयाजी पाटील, संभाजी पाटील, तसेच मोहन नलावडे यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातातील मयत तसेच जखमी मुंबई घनसोली येथून पाटस सातारा येथे मतदान करण्यासाठी जात होते. भवानी ट्रॅव्हल्सची बस कामशेत बऊर गावाजवळ आली असता भरधाव चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने चालकाने रस्त्याच्या कडेला पंचर झालेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. महामार्ग तसेच स्थानिक पोलिसांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी तळेगाव येथील पावना हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.