Home | Maharashtra | Mumbai | Accident record CCTV in Dadar Railway Station

महापरिनिर्वाण दिनी मुंबई मोठी दुर्घटना टळली..चैत्यभूमीवर दर्शनासाठी आलेल्या दोन महिला दादर स्टेशनवर थोडक्यात बचावल्या

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 02:49 PM IST

रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली दुर्घटना सोशल मीडियावर होत आहे व्हायरल.

  • Accident record CCTV  in Dadar Railway Station

    मुंबई- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशाच्या विविध भागातून अनुयायी मुंबईत पोहोचले आहेत. दरम्यान, दादर रेल्वे स्टेशनवर जीआरपी पोलिसांच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली आहे.

    गुरुवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास धावत्या ट्रेनमधून उतरर्‍याच्या प्रयत्नात दोन महिला रेल्वेखाली जात होत्या. प्लॅटफॉर्मवर असलेल्या जीआरपीच्या जवानाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने या दोन्ही महिलांचा जीव थोडक्यात बचावला. ही घटना प्लॅटफॉर्मवर बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत असलेली ही लोकल ट्रेन दादर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर उभी आहे. व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे ही ट्रेन प्लॅटफॉर्मवरुन सुरू झाल्यानंतर अचानक दोन महिला ट्रेनमधून उतरताना दिसत आहे. त्यापैकी एक महिला उतरताना अचानक प्लॅटफॉर्मवरुन खाली पडते. तितक्यात दुसरी एक महिला ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करते. परंतु तीही खाली पडते. या महिलांना पडताना पाहून तिथे उभे असलेले रेल्वे पोलिस तातडीने त्यांच्या मदतीला धावतात. ट्रेनखाली जाण्यापासून त्यांना वाचवतात.

Trending