आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक-एसटी बसच्या धडकेत 3 ठार 22 जखमी, कायनेटिक चौकात ओव्हर ब्रिजवर भीषण अपघात

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

अहमदनगर : नगर-पुणे रस्त्यावर कायनेटिक चौकात रेल्वे ओव्हर ब्रिजवर एसटी बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार, तर २२ जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास झाला. जखमींना उपचारासाठी तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते.

हा अपघात झाल्यानंतर बस पुलावरून पडेल की काय या भीतीने अनेक प्रवाशांनी उड्या टाकून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पुलावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाले.

गुरुवारी रात्री ९.३० च्या सुमारास पुण्याच्या दिशेने नगरकडे येणारा ट्रक आणि नगरहून पुण्याकडे जाणारी एसटी बस नगरच्या कायनेटिक चौकात रेल्वे पुलावर समोरासमोर धडकली. अपघातानंतर एसटी एकाबाजूला कलल्यामुळे प्रवाशांनी खाली उड्या मारल्या. या अपघातामुळे नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली दोन्ही बाजूंना लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...