आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर माशाचा टेम्पो पलटला; रस्त्यावर मासेच मासे, पकडण्यासाठी लोकांची गर्दी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायगड - रायगडमध्ये आज मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खालापूर येथून मासे घेऊन जाणारा टेम्पोला अपघात झाला. या अपघातानंतर मार्गावर सर्वत्र माशांचा खच पडला होता. हे मासे पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी झाली होती. खालापूर येथील तलावातून मासे भरुन टेम्पो मुंबईकडे जात असताना जुन्या मुंबई-पुणे मार्गावर हा अपघात घडला. अपघातानंतर माशांनी भरलेले सर्व ड्रम रस्त्यावर पडले आणि सोबत मासेही रस्यावर परसले. हे सर्व मासे मंगरुळ जातीचे होते. विशेष म्हणजे हे सर्व मासे जिवंत होते. त्यामुळे ते रस्त्यावर मधासोबत पडलेल्या पाण्यात तरंगू लागले. हे जिवंत मासे पकडण्यासाठी लोकांनी तसेच ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती.
 

बातम्या आणखी आहेत...