आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाली जल्लोषात नाचत होते लोक तेवढ्यात हवेतच फुटला Hot Baloon, व्हायरल होतोय धक्कादायक Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्यानमारच्या Taunggyi शहरामध्ये बलून फेस्टीव्हल सुरू होता. त्याठिकाणी हजारो लोकही जमलेले होते. पण या फेस्टीव्हलदरम्यान घडलेल्या एका घटनेने सर्वांनाच धक्का दिला. बलून फेस्टिव्हलमध्ये हॉट एअर बलून उडवला जातो. यावर्षी यादरम्यान मोठा अपघात घडला. आतषबाजीबरोबरच हा बलूनही हवेत गेला. खाली लोक जल्लोष करत होते. त्याचवेळी बलून फुटला आणि वेगाने तो खाली आला. त्यानंतर जमीनीवरच आतषबाजी सुरू झाली. 

 

Nine people were injured in Myanmar after this hot air balloon filled with fireworks exploded onto a crowd at an annual festival.

For more of today's videos: https://t.co/iOm40vn1kt pic.twitter.com/tuFnIfSNgz

— Sky News (@SkyNews) November 18, 2018

बलून खाली पडत असल्याचे दिसताच एकच गोंधळ उडाला आणि अनेक लोक जखमी झाले. आठवडाभरापूर्वी हा अपघात घडला असून त्याचा व्हिडिओ आता समोर आलाय. बलूनमध्ये आतषबाजीसाठीचा 50 किलो दारुगोळा होता. पण तो सर्व जमिनीवर फुटला. 

 


फुग्याच्या दोऱ्यांची गाठ सुटल्याने तो खाली कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. आयोजक म्हणाले की, दरवर्षीच्या तुलनेत यंदा येथे जास्त लोक आल्याने एकच गदारोळ उडाला होता. 


 

 

बातम्या आणखी आहेत...