आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Accident : क्लासेससाठी जाणाऱ्या विद्यार्थिनीला भरधाव ट्रकने चिरडले; सायकलचा चुराडा, विद्यार्थिनीचा मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - क्लासेससाठी सायकलवर जात असलेल्या विद्यार्थिनीला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यात विद्यार्थिनीचे दोन तुकडे झाले. गुरुवारी (25 जुलै) सकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला. 

 

गुंजन देवीदास पाटील (वय 14 वर्षे) असे मृत मुलीचे नाव आहे. गुंजन सकाळी आपल्या घरातून क्लासेससाठी सायकलवर निघाली होती. दरम्यान शहरातील साक्री रोडवर सिंचन भवनानजीक GJ 01 CY0267 या भरधाव ट्रकने तिला चिरडले. यात सायकल आणि मुलीचे दोन तुकडे झाले. मृतदेहाची अवस्था पाहिल्यानंतर स्थानिकांना झाडाच्या पाल्याने मृतदेह झाकला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर घटनास्थळी तणावाचे वातारवण निर्माण झाले होते.