आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Accident : पुणे - सातारा महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक; तीन तरुण ठार, चार जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुणे शहरापासून 30 किमी अंतरावर कोंढणपूर येथे ट्रकने दुचाकीला उडवले. या अपघातात तीन ठार तर आठ जण जखमी झाले आहेत. पुणे - सातारा महामार्गावर सोमवारी रात्री साडे बाराच्या सुमारास हा अपघात घडला. 


पुण्याजवळील तळजाई टेकडीवर सर्वांनी मित्राच्या वाढदिवसाची पार्टी केली. पार्टी केल्यानंतर तीन दुचाकींवर आठ शिवापूर येथील दर्ग्याच्या दर्शनाला निघाले होते. दरम्यान त्यांच्या दुचाकीला ट्रकने उडवले. यात एका दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला. तर अन्य जखमी झाले. 


या अपघातात अनिकेत रणदिवे, सुशील कांबळे, सुरेश शिंदे यांचा मृत्यू झाला तर करण जाधव, राकेश कुऱ्हाडे, अमर कांबळे, चेतन लोखंडे हे जखमी झाले आहेत. हे सर्व पुण्यातील तळजाई झोपडपट्टी येथील रहिवासी होते. जखमींना भोरच्या श्लोक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 


 

बातम्या आणखी आहेत...