Home | Business | Personal Finance | accidental insurance information

वैयक्तिक अपघात विमा : विमाधारकांच्या मुलांच्या शाळेचे शुल्कही कव्हर होते या विम्यामध्ये

पराग वेद | Update - Feb 27, 2019, 02:53 PM IST

 आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये सकाळी घरातून निघाल्यापासून ते सायंकाळी परत येण्यापर्यंत आपण सर्वच घाईतच असतो

 • accidental insurance information

  आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये सकाळी घरातून निघाल्यापासून ते सायंकाळी परत येण्यापर्यंत आपण सर्वच घाईतच असतो. त्यामुळे अपघाताची शक्यता दिवसेंदिवस वाढतच जात आहे. अशा वातावरणात वैयक्तिक अपघात विमा सर्वात मोठा आधार ठरू शकतो. हा कमी खर्चिक आहे इतकेच नाही, तर हा तुमच्या गरजेनुसार तुम्ही काढू शकतात.


  वैयक्तिक अपघात विम्यामध्ये विमाधारकांच्या मृत्यूचा किंवा अपंगत्वाचा विमा काढला जातो. पायाभूत स्वरूपात मृत्यू झाल्यास मिळण्याच्या कव्हर व्यतिरिक्त आंशिक किंवा पूर्ण अपंगत्व आल्यास अतिरिक्त सुरक्षा ही घेता येते. अपघातांनंतरही उत्पन्न कायम राहावे, यासाठी त्यालाही या विम्यात समाविष्ट करता येते. यामुळे कुटुंबीयांचाही समावेश करण्याचा पर्याय असतो. वैयक्तिक अपघात विम्यामुळे आर्थिक नियोजनाला कशा प्रकारे मदत होते, ते आपण या ठिकाणी पाहूयात.


  अपंगत्व कव्हरेज : विमाधारक अपघातात पूर्णपणे किंवा आंशिक स्वरूपात अपंग झाला तर त्या विमाधारकाला आर्थिक मदत मिळेल. मग झालेली जखम ही कोणत्याही प्रकारची असली तरी. जर विमा धारकांचा मृत्यू झाला तर नॉमिनीला पाच लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत भरपाई मिळेल.


  उपचारांवरील खर्च : अपघात झाल्यानंतर तत्काळ उपचाराची आवश्यकता असते. वैयक्तिक अपघात विम्यामध्ये हॉस्पिटल आणि उपचारावर होणाऱ्या खर्चासह अॅम्ब्युलन्स आदींवरील खर्चही कव्हर होतो. विमाधारकाचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराचा खर्चही कव्हर होतो. मात्र, जुन्या आजारामुळे मृत्यू झाल्यास विम्याचा लाभ मिळणार नाही.


  उत्पन्नही कव्हर : अपघात विम्यामध्ये विमाधारक व्यक्तीचे फ्रॅक्चर झाल्यास, पाहण्यास, ऐकण्यास किंवा बोलण्यास त्रास झाल्यास त्या व्यक्तीच्या उत्पन्नावर परिणाम झाल्यास, या विम्यात त्यालाही कव्हर करता येते. उदाहरणासाठी जर व्यक्तीला अस्थायी अपंगत्व आले तर विमा कंपनी बरे होईपर्यंत आठवड्याच्या आधारावर पैसे देईल.


  मुलांचे शिक्षण : विमाधारक व्यक्तीच्या अपघातामुळे त्याच्या मुलाच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही. कारण या विम्यामध्ये यालाही कव्हर करण्याची तरतूद असते. विम्यातील रकमेमधील १० टक्के किंवा मुलांच्या शिक्षण शुल्काची वास्तविक रक्कम या पैकी जी रक्कम कमी असेल ती मिळेल.


  मॉडिफिकेशन अनाउन्स : अनेकदा अपघातात व्यक्ती पॅरालिसिसच्या स्थितीत जातो, त्यावेळी त्याला व्हील चेअरचा वापर करावा लागतो. चालण्या-फिरण्यासाठी त्याला व्हीलचेअरमध्ये काही बदल करावे लागतात. या विम्यात घर आणि वाहनांमध्ये आवश्यक असलेल्या बदलाचाही कव्हर करते.


  कुटुंबीयांना नेण्याचा खर्च : विमाधारक व्यक्ती घरापासून १५० किमीपेक्षा जास्त दूर हॉस्पिटलमध्ये भरती असल्यास, त्याच्या कुटुंबीयातील व्यक्तींना त्याच्यापर्यंत जाण्यासाठी खर्च करावा लागतो. ही विमा योजना ५०,००० रुपयांपर्यंत खर्च देते. त्याचे रिइंबर्समेंट मिळते.
  मात्र, या सर्वामध्ये अपघात विमा काढताना पॉलिसीमधील अटींकडे नक्कीच लक्ष द्या. पॉलिसी जारी झाल्यानंतर १५ दिवसांपर्यंत मोफत-लुकचा काळ असतो. या दरम्यान तुम्हाला हवे असल्यास तुम्ही विमा रद्दही करू शकता. पॉलिसी रिन्यू करण्यासाठीही ३० दिवसांचा कालावधी असतो. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे विमा नेहमी प्रसिद्ध कंपनीकडेच काढा.


  - हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. या आधारावर गुंतवणुकीतून नुकसान झाल्यास दैनिक 'दिव्य मराठी नेटवर्क' जबाबदार राहणार नाही.


  पराग वेद, कार्यकारी उपाध्यक्ष, टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स

Trending