आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडीचा झोका बनवून खेळत होती मुलगी, अचानक बसला जोराचा झटका अन् आईवडिलांच्या डोळ्यांदेखत घडले असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेल्लारी - कर्नाटकमधील बेल्लारी जिल्ह्यीतील सिरुगुप्पा येथे एका दुर्घटनेमध्ये 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. साडीने बांधलेल्या झोक्यामध्ये फसल्याने तिचा जीव गुदमरला होता. तिला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण वाटेतच तिचा मृत्यू झाला. पोलिस संबंधीत प्रकरणाची चौकशी करत आहे.

 

कशी घडली दुर्घटना?

बेल्लारीच्या सिरुगुप्पा येथे राहणारी परवीन बेगम साडीने बांधलेल्या झोक्याला तिच्या गळ्यात टाकून झोका खेळण्याचा प्रयत्न करत होती. दरम्यान ती झोक्यामध्ये फसल्याने तिचा गळा आवळला गेला. त्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. पण तोपर्यंत परिस्थिती आई-वडीलांच्या हाताबाहेर गेली होती.


मुलीच्या वडिलांनी केली विनवणी
परवीन बेगमच्या वडिलांनी सांगितले पोलिसांना दिलेल्या विधानात सांगितले की, ती आमची परी होती. त्यांनी विनवणी करत सांगितले की, मी सर्व पालकांनी विनंती करतो की मुलांच्या सुरक्षेसाठी साडीचे झोके बांधू नका.

 

बातम्या आणखी आहेत...