आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुर्वेदानुसार दूध पिण्याचे काही नियम 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दूध हे व्हिटॅमिन आणि खनिजांचा उत्तम स्रोत आहे. दुधात अ, ब आणि ड व्हिटॅमिन, कॅल्शियम, प्रथिने तसेच लॅक्टिक अॅसिड असते. पण अनेकांना दूध प्यायल्यावर त्रास होतो. आयुर्वेदानुसार दूध पिण्याचेही काही नियम आहेत. हे नियम पाळल्यास दूध प्यायल्याने तुम्हाला त्रास होणार नाही. गायीचे दूध सर्वात पौष्टिक असते. तसेच वजन कमी करण्यासाठीही दूध पिणे हा उपाय असू शकतो. पचनशक्ती योग्य नसेल तर दूध पचत नाही.  - अनेक लोकांना दुधात साखर घालून प्यायची सवय असते. रात्री साखर न घालता दूध प्यायल्याने आरोग्यास अधिक फायदा होतो. दुधात एक ते दोन चमचे तूप घातल्यास अधिक फायदा होतो.  - आयुर्वेदानुसार ताजे आणि जैविक दूध पिणे शरीराला आवश्यक आणि चांगले असते. पिशवीबंद दूध पिण्यापेक्षा ताजे आणि जैविक दूध पिणे आरोग्यास लाभदायक ठरते.  - अनेकांना कच्चे थंड दूध पिणे आवडते, मात्र ते चांगले नाही. दूध गरम करून प्यावे.  - ज्यांना दूध प्यायल्यावर पचत नाही, त्यांनी दुधात एक चिमूटभर आलं, लवंग, वेलची, केशर, दालचिनी आणि जायफळ यांचे मिश्रण करून दुधाचे नियमित सेवन करावे.  - अनेकदा काही कारणामुळे रात्रीचे जेवण होत नाही, त्या वेळी दुधात केशर आणि वेलची टाकून प्यावे. यामुळे झोपही चांगली लागते आणि शरीराला ऊर्जा मिळते.  - कधीही खारट वस्तूंसह दूध घेऊ नका. दुधासोबत आंबट फळेही खाऊ नयेत. 

बातम्या आणखी आहेत...