Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | According to Hindu Religion, food should start with sweet ; Science and Ayurveda also say the same

हिंदू धर्मानुसार गोड पदार्थाने करावी जेवणाची सुरुवात, विज्ञान आणि आयुर्वेद देखील हेच सांगतात

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 09, 2019, 03:48 PM IST

गोड पदार्थाने भोजनाची सुरुवात केल्याने पचनक्रिया सुधारण्यास होते मदत

 • According to Hindu Religion, food should start with sweet ; Science and Ayurveda also say the same

  जीवन मंत्र डेस्क - हिंदू धर्माच्या ग्रंथांनुसार देवाला गोड पदार्थांचा नैवेद्य दिला जातो. यानंतर देवाचा प्रसाद घेऊन आपल्या भोजनाची सुरुवात करावी. गोड पदार्थाने जेवणाची सुरुवात करणे शुभ मानले जाते. आयुर्वेद ग्रंथांनुसार गोड पदार्थाने जेवणाची सुरुवात करावी. इतकेच नाही तर जेवणाची सुरुवात गोड पदार्थाने करावी हे विज्ञानाचे म्हणणे आहे. यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे.

  या परंपरेविषयी काय म्हणते विज्ञान
  गोड पदार्थांने जेवणाची सुरुवात करणे आरोग्यासाठी चांगले असते. आपल्या आरोग्याविषयी काळजी घेणाऱ्या चांगल्या सवयींपैकी ही एक चांगली सवय आहे. डायटिशियन डॉ. प्रीति शुक्लानुसार एक स्वस्थ व्यक्तीने आपल्या जेवणाची सुरुवात गोड पदार्थाने करावी. असे केल्याने इंसुलिन सिक्रेशन होते. यामुळे जेवण लवकरच पचते आणि त्यातून ऊर्जा देखील मिळते.


  याबाबत आयुर्वेद काय म्हणते?
  निवृत्त आयुर्वेद जिल्हा वैद्यकीय अधिकारी रोशनलाल मोड यांनी सांगितले की, चरक संहितेनुसार आयुर्वेदात 6 प्रकारचे रस सांगितले आहेत. ते लक्षात घेऊन जेवणाची सुरुवात गोड पदार्थांने करायला हवी. त्यानंतर आंबट, तुरट, कडू आणि मग पुढील भोजन करावे. यामुळे पचनक्रिया सुधारते. गोड पदार्थाने केलेल्या जेवणाची सुरुवात पचनक्रियेसाठी उत्तम मानली जाते. यामुळे शरीरातील इतर रसांमधील संतुलन टिकून राहते.

  आयुर्वेदात सांगण्यात आलेले 6 रस

  गोड, आंबट, खारट, तिखट, तुरट, कडु

Trending