क्रिकेट / कोहलीच्या मते, टी-20 विश्वचषकात असेल कृष्णा सरप्राइज पॅकेज, कृष्णाला न्यूझीलंड दाैऱ्यात संधी; विजय हजारे ट्राॅफीत 17 विकेट

24 जानेवारी पासून न्यूझीलंडचा दाैरा

दिव्य मराठी

Jan 09,2020 09:41:00 AM IST

इंदूर : कर्णधार विराट काेहलीने यजमान टीम इंडियाच्या घरच्या मैदानावरील दुसऱ्या टी-२० सामन्यातील विजयाचे श्रेय युवा गाेलंदाजांना दिले अाहे. यासाठी त्याने गाेलंदाजांवर काैतुकाचा वर्षाव केला. 'दुखापतीमधून सावरलेल्या बुमराहने अाता कमबॅक केले अाहे. युवा गाेलंदाज शार्दूल ठाकूर अाणि नवदीप सैनीनेही उल्लेखनीय कामगिरी केली अाहे. त्यामुळे या सर्वांची कामगिरी काैतुकास पात्र ठरणारी अाहे, अशा शब्दांत काेहलीने या युवा खेळाडूंची स्तुती केली. याचदरम्यान त्याने युवा गाेलंदाज प्रसिद्ध कृष्णाचेही खास काैतुक केले. या युवा गाेलंदाजाची विजय हजारे ट्राॅफी स्पर्धेतील खेळी सर्वात लक्षवेधी ठरली. त्याने या स्पर्धेत १७ विकेट घेऊन निवड समितीसह टीम इंडियाच्या कर्णधार विराट काेहलीचेही खास लक्ष वेधून घेतले अाहे. 'नाेव्हेंबरमध्ये अाॅस्ट्रेलियात हाेणाऱ्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान युवा गाेलंदाज प्रसिद्ध कृष्णा हा सर्वांसाठी सरप्राइज पॅकेज राहील,' असेही काेहलीने यादरम्यान अावर्जून सांगितले. याशिवाय यातूनच त्याने तगडा संघ निवडीसाठीच्या तयारीचेही संकेत दिले अाहेत. अाॅस्ट्रेलियाच्या पिचवर अव्वल गाेलंदाजीची क्षमता असलेल्या गाेलंदाजांची निवड करण्यावरच अधिक भर देणार असल्याचेही त्याने या वेळी स्पष्ट केले अाहे. टी-२० चा विश्वचषक हा अाॅस्ट्रेलियात हाेणार अाहे.


सुपर अाेव्हरमध्ये उल्लेखनिय कामगिरी


कृष्णाने १४० ते १४५ िकमी/ प्रति तासाच्या वेगाने गाेलंदाजी करण्याची अापली क्षमता सिद्ध केली अाहे. याच भेदक गाेलंदाजीमुळे त्याच्या नावाची अायपीएलच्या गत सत्रात चांगलीच चर्चा हाेती. त्याने काेलकाता संघाकडून खेळताना सुपर अाेव्हरमध्ये दिल्लीविरुद्ध १० धावा दिल्या हाेत्या. त्याची हीच कामगिरी सर्वांचे लक्ष वेधणारी ठरली.


टी-२० मालिकेतून जखमी लाथम बाहेर


न्यूझीलंड संघाचा फलंदाज टॉम लाथमचे अाता भारताविरुद्ध मालिकेत खेळण्याचे स्वप्न भंगले. बाेटाला झालेल्या गंभीर दुखापतीचा माेठा फटका बसला. याच दुखापतीमुळे अाता त्याला भारताविरुद्ध टी-२० मालिकेला मुकावे लागणार अाहे. ताे या मालिकेतून बाहेर झाला. मात्र, त्याला पुढच्या महिन्यात ५ फेब्रुवारीपासून सुरू हाेणाऱ्या भारताविरुद्ध वनडे मालिकेत कमबॅक करण्याची संधी मिळण्याची शक्यता अाहे. तसेच गवान गाेलंदाज बाेल्टचेही या मालिकेतील खेळणे अद्याप अनिश्चित अाहे. त्याच्याही हाताला दुखापत झालेली अाहे.


ग्रीनवर संदिग्ध अॅक्शनप्रकरणी तीन महिन्यांची बंदी; अायपीएलला मुकण्याची शक्यता!


ऑस्ट्रेलिया संघातील ऑलराउंडर क्रिस लीन अाता अापल्या संदिग्ध गाेलंदाजी अॅक्शनमुळे अडचणीत सापडला. त्यामुळे त्याच्यावर अाता याचप्रकरणी तीन महिन्यांची बंदी घालण्यात अाली अाहे. यातूनच त्याचा अायपीएलमधूल सहभाग अनिश्चित अाहे.

X
COMMENT