आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन कायद्यानुसार विद्यापीठात विविध मंडळांवर सदस्यांची नियुक्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- नवीन कायद्यानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात गठीत विविध मंडळांवर सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुलगुरू डाॅ. मुरलीधर चांदेकर यांच्याकडून नामांकन करण्यात आल्याची अधिसूचना विद्यापीठाने सोमवार २४ सप्टेंबरला काढली आहे. संशोधनसह विविध दहा मंडळांवर सदस्यांचे नामांकन केल्याने शैक्षणिक कार्य वाढीस चालना मिळणार आहे.


सार्वजनिक महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कायदा २०१६ मध्ये मंजूर करण्यात आल्यानंतर यामध्ये व्यापक बदल करण्यात आले आहे. विद्यापीठ परीक्षेत्रात संशोधन तसेच उच्च दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे. तसेच स्थानिक पातळीवरील गरजांच्या उद्देशाने संशोधन करण्यास प्राधान्यक्रम देणे या महत्वपूर्ण बाबी नवीन कायद्यात विचारात घेण्यात आल्या. त्याअनुषंगाने संशोधन मंडळ, बोर्ड ऑफ लाइफ लाँग लर्निंग अॅण्ड इक्सटेंशन, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, माहिती तंत्रज्ञान मंडळ, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय साहचार्य मंडळ, अधिकारी-कर्मचारी चौकशी समिती, ज्ञान संशाधन समिती, खरेदी समिती, इमारत व बांधकाम मंडळ यावर विविध सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर बॉयो टेक्नालॉजी विभाग प्रमुख डॉ. प्रसाद वाडेगावकर यांची नियुक्ती करण्यात आली. शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या बोर्ड ऑफ रिसर्चवर (संशोधन मंडळ) गोंदिया जिल्ह्यातील देवरी रोड आमगाव येथील भवभूती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम एम. भुस्कुटे, मुंबई येथील गुरलाईफ अॅग्रोटेक एलएलपी तसेच आर अॅण्ड डी सेंटरचे संस्थापक तसेच व्यवस्थापकीय भागीदार डॉ. धनंजय पांडे, सावला फार्म अमरावतीचे प्रफुल्ल सावला, प्लॉस्टी सर्ज इंडस्ट्रीचे कमलेश डागा, नागपूर येथील श्रीनिधी आयुर्वेद पंचकर्म चिकीत्सालयाचे वैद्य जयंत देवपुजारी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी अधिकारी गोविंद पांडे, खामगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष गोविंद जोग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चौकशी समितीवर सेवानिवृत्त न्यायाधिश व्ही. एन. तांबी, अमरावतीच्या विद्याभारती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एफ.सी. रघुवंशी यांची निवड करण्यात आली. खरेदी समितीवर अमरावतीच्या कस्तुरी मेटल कॅम्पोझिटीस प्रा. ली.चे समित सिंगई यांची तर इमारत व बांधकाम समितीवर नागपूर येथील मिनल काळे व परमजीत आहुजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


बोर्ड ऑफ लाइफ लाँग लर्निंग अॅण्ड इक्सटेंशन 
बोर्ड ऑफ लाइफ लाँग लर्निंग अॅण्ड इक्सटेंशनवर किरण पातुरकर, अंबादास मोहिते, डॉॅॅ. सुभाष गवई, विद्यापीठाच्या मराठी विभागातील डॉ. प्रणव कोलते, विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागातील डॉ. सुहास पंचपांडे, पांढरकवडा येथील शिवरामजी मोघे महाविद्यालयाच्या इतिहास विभागातील डॉ. योगेश उगले, अमरावतीच्या श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या भुगोल विभागातील डॉ. चेतन राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


परीक्षा व मूल्यमापन मंडळ 
परीक्षा व मूल्यमापन मंडळावर नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या कवियत्री बहिणाबाई चौधरी केंद्राचे प्रमुख डॉ. बी. पी. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. 


माहिती व तंत्रज्ञान मंडळ 
माहिती व तंत्रज्ञान मंडळावर विद्यापीठातील संगणक विभागातील डॉ. एस. एस. शेरेकर, वित्त विभागातील उपकुलसचिव डॉ. नितीन कोळी, सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शितल धांडे यांची नियुक्ती करण्यात आली. 


राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय साहचार्य मंडळ 
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय साहचार्य मंडळावर विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी विभागातील डॉ. अनिता पाटील, नेर परसोपंत येथील आबासाहेब पारवेकर महाविद्यालयातील डॉ. उदय नवलेकर, अमरावतीच्या डिग्री ऑफ फिजीकल एज्युकेशनचे डॉ. के. के. देवनाथ यांची नियुक्ती करण्यात आली. 


ज्ञान संशोधन मंडळ 
ज्ञान संशोधन मंडळावर विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ इंटरडिसीप्लीनरी स्टडीजच्या डीन डॉ. एम. पी. काळे, विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. बी. नायक, मुंबईच्या पवई आयआयटीच्या मुख्य ग्रंथपाल डॉ. मंजू नायका, अमरावती येथील डी. के. इंडस्ट्रीजचे दिलीप अग्रवाल यांचा समावेश आहे. 

बातम्या आणखी आहेत...