Home | Jeevan Mantra | Dharm | According to Vastu, The Main Door of The House Should Open Inside

वास्तूशास्त्रानुसार आतील दिशेने का उघडावा घराचा मुख्य दरवाजा

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 06, 2019, 01:54 PM IST

वास्तुशास्त्रात घरातील मुख्य दरवाजाविषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत

 • According to Vastu, The Main Door of The House Should Open Inside

  जीवनमंत्र डेस्क- कोणत्याही घरामध्ये मुख्य दरवाजाचे विशेष महत्व असते, कारण दरवाजातूनच सर्व पॉझिटिव्ह एनर्जीचा प्रवेश होत असतो. घरात सुख-समृद्धी आणि प्रगतीसाठी दरवाजाशी जोडलेल्या काही विशिष्ट नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जर आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वास्तूशास्त्रनुसार घराचा मुख्य दरवाजा नेहमी आत उघडायला पाहिजे. बाहेर उघडणाऱ्या दरवाजाला अशुभ मानले जाते. असे झाल्यास घरात पैसे टिकण्यात अडचणी निर्माण होतात. यासोबतच दरवाजा उघडताना आणि बंद करताना आवाज येता कामा नये.


  वास्तुशास्त्रात घरातील मुख्य दरवाजाविषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत

  1. घराचा मुख्य दरवाजा पूर्व आणि उत्तर दिशेला असावा.

  2. घराच्या मुख्य दरवाजा समोर पायऱ्या असू नये.

  3. मुख्य दरवाजा घराच्या मधोमध नसावा.

  4. घराच्या मुख्य दरवाजा समोर खांब, झाड किंवा भिंत असू नये, यांची सावलीही गेटवर पडता कामा नये.

  5. घराचा मुख्य दरवाजा समोरील रस्त्यापेक्षा ऊंच असावा.


Trending