आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • According To VHP Model, Ram Temple Will Be Ready In 3 Years, Will Take 10 Rupees Each From Devotees.

विहिंपच्या मॉडेलनुसार ३ वर्षांत तयार होईल राममंदिर, भाविकांकडून प्रत्येकी १० रुपये घेणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीचे अध्यक्ष महंत दास यांनी सांगितली रूपरेषा
  • कारसेवकांच्या स्मृतीत भव्य विजयस्तंभ उभारणार

अयोध्या - राममंदिराची उभारणी विश्व हिंदू परिषदेने तयार केलेल्या प्रतिकृतीनुसार होईल, असे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांनी सांगितले. तसेच विहिंपच्या कार्यकाळात पैलू पाडण्यात आलेल्या दगडांचा वापर मंदिर उभारणीसाठी करण्यात येईल, तर मंदिरात रामलल्लांची पूजा वैष्णव समाजाचीच व्यक्ती करेल असा दावाही त्यांनी केला. ते म्हणाले की, मंदिराची प्रतिकृती तयार करणाऱ्या चंद्रकांतभाई सोमपुरा यांच्या देखरेखीत मंदिराची उभारणी करण्यात येईल. निर्माणकार्य वेगाने व्हावे यासाठी इतर परिसरातील काम एखाद्या सक्षम संस्थेलाच द्यावे लागेल. समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दास यांनी पहिल्यांदा अयोध्या दौरा केला. या वेळी भास्करशी संवाद साधला.
 

मंदिराची प्रतिकृती : मंदिराच्या प्रतिकृतीत बदल होण्याची शक्यता नाही. कळस आणि बाहेरील परिसर वाढू शकतो. ७० एकर परिसराला भव्य स्वरूप देऊ. 

सरकारी निधी : हे सरकारी मंदिर नाही. उभारणी सरकारी पैशाने होणार नाही. मंदिर आंदोलनाच्या वेळी कार्यशाळेसाठी आम्ही सव्वा रुपये देणगी मागितली होती. आता दहा रुपये मागणार आहोत. थेट बँक खात्यात देणगी देता येईल. 

ओबीसींचे प्रतिनिधित्व : मी कोणाचेही विधान ऐकलेले नाही. मंदिर सर्वांचे आहे. मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. समिती के‌वळ व्यवस्थेचा एक भाग आहे. 

पुढील बैठक : या महिन्याच्या शेवटी होऊ शकते. पायाभरणी झालेली आहे. मंदिर उभारणीपूर्वी वैदिक विद्वानांसोबत चर्चा करून  विश्वस्तांचा सहमतीनंतर पूजेची तिथी निश्चित केली जाऊ शकते. 
कारसेवकांसाठी : मंदिर निर्माण सुरू असताना पूजेमध्ये कारसेवकांची उपस्थिती त्यांचा अधिकार आहे. शहीद कारसेवकांच्या स्मृतीत भव्य विजयस्तंभाची उभारणी करण्यात येईल. 

पूजेचा अधिकार :  भगवान राम सामाजिक समरसतेचे केंद्रबिंदू आहेत या मुद्द्यावर कुठलेही दुमत नाही. समरसतेसाठी संतांनी मंदिर उभारणीपूर्वी १९८९ मध्ये दलिताकडून मंदिराची पायाभरणी केली होती. ते आजही मंदिर समितीचे सदस्य आहेत. वैष्णव पूजन पद्धतीसह वैदिक जीवन जगणारे मंदिरातील पुजारी असतील.
 

बातम्या आणखी आहेत...