आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजसमंद - येथे 16 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्या प्रकरणी आरोपीला 10 वर्षांची शिक्षा आणि 10 हजारांचा दंड सुनावला आहे. आधी पोलिसांनी या प्रकरणी एफआर दाखल करण्यासाठी अर्ज केला होता, पण पोलिसांनी फाईल परत पाठवत पुन्हा विस्तृत चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. नंतर डीएमए चाचणीत बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. कोर्टाने डीएनए चाचणीला आधार मानत शिक्षा सुनावली.
असे आहे प्रकरण
- 53 वर्षीय हिरानाथ (नाव बदललेले) मुलीबरोबर राहतो. 18 एप्रिल 2015 रोजी पोलिसांना रस्त्यावर कपड्यात गुंडाळलेले एक नवजात बाळ सापडले होते. प्राथमिक तपासात हे बाळ एका अल्पवयीन मुलीचे असल्याचे स्पष्ट झाले.
- पोलिसांनी प्रकरण दाखल करत 4 फेब्रुवारी 2016 रोजी पॉस्को अॅक्ट अंतर्गत चौकशी पूर्ण करत आरोपीची माहिती मिळत नसल्याचे सांगितले. तसेच कोर्टाला एफआर दाखल करण्याची मागणी केली. पण कोर्टाने पोलिसांना विस्तृत चौकशीचे आदेश दिले होते.
बाळाला जन्म देऊन ही तरुणी रुग्णालयात गेली तेव्हा वडिलांना चिमुरडीला रस्त्यावर फेकले
- तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 18 एप्रिल 2015 रोजी सकाळी 7 वाजता कपड्याच्या पिशवित बाळ गुंडाळलेले रस्त्यावर सापडले.
- चौकशीत समजले की, जवळच्या एका अल्पवयीन मुलीचे ते आहे. पोलिस चौकशीला गेले तेव्हा समजले की, बाळाला मुलीने जन्म दिला असून ती मुलगी 9 वीत शिकत होती.
- बाळाला जन्म दिल्यानंतर तीची तब्येत बिघडली तेव्हा तिने नवडात मुलीला तिच्या वडिलांकडे ठेवले आणि ती हॉस्पिटलमध्ये गेली. ती परत आली तेव्हा तिला बाळ घराबाहेर असल्याचे सापडले. पोलिसांनी आई आणि बाळ दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण वडिलांना वाचवण्यासाठी पीडितेने वारंवार जबाब बदलले.
- पोलिसांनी सांगितले की, एका ओळखीच्या तरुणाने या तरुणीवर बलात्कार केल्याने ती गर्भवती झाली आणि नंतर तो मुलगा पळून गेला.
तरुणी आई बनली पण पोलिस गंभीर नाहीत
कोर्टाने तरुणी गर्भवती असल्याच्या प्रकरणात एफआर योग्य नसल्याचे सांगत पीडितेची चौकशी आणि डीएनए चाचणीतून सत्य शोधण्यास सांगितले होते. कोर्टाने असेही म्हटले होते की, पीडितेच्या आईचा मृत्यू झाला होता, तिला संशयित का समजले नाही. त्याची परत चौकशी करण्यास कोर्टाने सांगितले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.