आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समलैंगिक मित्राला जखमी करणारा अाराेपी पोलिस तावडीतून पळाला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- समलैंगिक संबंधात जोडीदाराने दुसऱ्याच्या काेयत्याने जीवघेणा हल्ला करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला हाेता. याप्रकरणी खडक पोलिसांनी अाराेपी अनुराग कमलेश भाटियाला अटक केली हाेती. रविवारी रात्री त्याला जुलाब-उलट्यांचा त्रास हाेत असल्याने शुक्रवार पेठेतील कमलनयन रुग्णालयात पोलिस घेऊन गेले होते. मात्र, तिथे त्याने पाेलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केले. 


खडक पोलिसांत अाराेपी अनुराग भाटियावर हत्येचा प्रयत्न करणे तसेच शस्त्रास्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल आहे. समलैंगिक संबंधादरम्यान जोडीदार सातत्याने शारीरिक सुखाची मागणी करत असल्याने अनुरागने जोडीदारावर कोयत्याने हल्ला केला होता. यात त्याच्या जोडीदाराच्या जबड्याला दुखापत झाली आहे. 

 

पोलिसांनी त्याला घटनेनंतर लागलीच अटक केली होती. मात्र, त्याला जुलाब-उलट्यांचा त्रास हाेऊ लागल्याने पाेलिसांनी त्याला रुग्णालयात नेले हाेते. डाॅक्टरांनी त्याच्यासाठी अाैषधांची चिठ्ठी लिहून दिली. ती औषधे अाणण्यासाठी सातपुते मेडिकलमध्ये गेले. नंतर जुलाब हाेत असल्याचा बहाणा अनुरागने केला.पाेलिस त्याला बेड्यासह शाैचालयात घेऊन गेले. मात्र संधी खिडकीतून ताे पळून गेला. 

बातम्या आणखी आहेत...