आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्सपेक्टर सुबोध कुमार यांची हत्या करणाऱ्याने सांगितले, आधी कुऱ्हाडीने केला होता वार आणि मग..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलंदशहर - बुलंदशहर हिंसाचारात इन्सपेक्टर सुबोध कुमार सिंह यांच्या हत्येप्रकरणी 25 दिवसांनंतर पोलिसांनी मुख्य आरोपी प्रशांत नटला अटक केली आहे. पोलिस चौकशीत आरोपीने या घटनेबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. नटला नोएडाच्या सीमेवरून अटक करण्यात आली आहे. 


तीन डिसेंबर रोजी स्याना परिसरात गोतस्करीच्या प्रकारानंतर हिंसाचार भडकला होता. त्यात इन्सपेक्टर सुबोध कुमार आणि गावातील तरुण सुमित मारला गेला होता. स्यानामधील इन्सपेक्टर ला प्रशांत नटनेच गोळी मारली होती, असे सांगितले जात आहे. हिसाचारापासूनच प्रशांत नट कुटुंबासह फरार झाला होता. 


सेल्फ डिफन्समध्ये इन्सपेक्टरच्या गोळीने मारला गेला होता सुमित 
जिल्ह्यातील एसएसपी प्रभाकर चौधरींनी सांगितले की, यापूर्वी जीतू फौजीला अटक करण्यात आली होती. पण त्याच्या विरोधात हत्येचा काहीही ठोस पुरावना मिळाला नाही. तर अटक करण्यात आलेल्या प्रशांत नटने चौकशीदरम्यान गुन्हा मान्य केला आहे. त्याने इन्स्पेक्टर सुबोध कुमारची हत्या त्यांच्यात पिस्तुलाने केली होती. प्रशांत नटबरोबरच चिंगरावठीमधील राहुल, डेवीड, जौनी, लौकेंद्र, कलुआ आणि हरवानपूर येथील राहुलही होता. तर कलुआ अजूनही फरार आहे. 

 
एसएसपीने सांगितले की, या लोकांनी इन्सपेक्टरला घेराव घातला होता. कलुआने डोक्यात कुऱ्हाडीने प्रहार केला. त्यानंतर इतर लोकांनी दगडफेक केली. प्रशांत नटने इन्स्पेक्टरची पिस्तुल हिसकावून गोळी मारली होती. त्यांनी सांगितले की, सध्या या प्रकरणात योगेश राजसह 15 कुप्रसिद्ध आरोपी अजूनही पोलिसांच्या तावडीत आलेले नाहीत. 

 

बातम्या आणखी आहेत...