Home | National | Other State | Accused Opened Secret Of Child Murder Eight Years Ago After Dispute With Father

वर्षांपूर्वी घराबाहेर खेळता-खेळता अचानक बेपत्ता झाला होता मुलगा, शोधूनपण सापडला नव्हता, दोन दिवसांपूर्वी आरोपीने वडिलांना फोन केला आणि म्हणाला- तुझ्या मुलाला मी गायब केले आणि गाडून टाकले...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 16, 2019, 04:11 PM IST

8 वर्षानंतर झाला खूनाचा खुलासा

  • Accused Opened Secret Of Child Murder Eight Years Ago After Dispute With Father

    बांदा(उत्तर प्रदेश)- उत्तरप्रदेशच्या बांदा जिल्ह्यामध्ये सहेवा गावात आठ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलाचा खुलासा आरोपीने आता केला आहे. ए.एस.पी. लाल भरत कुमार पाल यांनी सांगितले की, 1 ऑगस्त 2010 ला सहेवा गावातून राजू मिश्राचा सहा वर्षांचा मुलगा भोला आपल्या बहिणीसोबत खेळत असताना अचानक गायब झाला होता.


    कुटुंबीयांनी सुरूवातीला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी गावातील लोक हिदायत उल्ला, राकेश कुमारी आणि दुर्गा विरूद्ध अपहरण आणि हत्येचा गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेतले. मुलाचा मृतदेहपण सापडला नाही. 2016 मध्ये कोर्टाने पुराव्या अभानी तिघांची सुटका केली होती. आता दोन तीन दिवसांपूर्वी गावातील रंगीलाल आणि राजू मिश्रामध्ये भांडण झाले. वादानंतर रागात येऊन रंगीलालने राजूच्या मुलाची हत्या करून मृतदेह गायब करण्याची गोष्ट सांगितली. ही बाब राजूने पोलिसांना सांगितली आणि पोलिसांनी रंगीलालला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने हत्त्या करून मृतदेह गाडल्याचे कबुल केले.

Trending