आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअजमेर - एका महिलेवर 6 वर्षे बलात्कार करून तिच्याकडून लाखो रुपये उकळल्याचे समोर आले आहे. आरोपी तरुणाने महिलेला आणखी पैसे मागितले, मागणी पूर्ण झाली नाही म्हणून त्याने महिलेच्या सर्व अश्लिल क्लिप तिच्या नवऱ्याला पाठवल्या. पोलिसांनी सांगितले की, महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या भागात राहणारा इन्साफ अली 6 वर्षांपासून तिचे लैंगिक शोषण करत होता. आरोपी तिला अजमेरच्या गेस्ट हाऊसलाही घेऊन गेला होता. यादरम्यान अनेकवेळा आरोपीने तिचे अश्लिल व्हिडिओ आणि फोटोही घेतले. पीडितेचे व्हिडिओ आणि फोटो अनेक भागांत व्हायरल झाले. मुख्य आरोपी इन्साफ अली सध्या फरार आहे.
आरोपीने अनेकदा वेगवेगळ्या वेळी महिलेला धमकावत तिच्याकडून 2 लाख रुपये उकळले. त्यानंतर महिलेला त्याची मागणी पूर्ण करता आला नाही तर आरोपीने 10 ऑगस्टला पीडितेचा पती आणि मावशीच्या मुलाला अश्लिल फोटो आणि व्हिडिओ पाठवले. पीडितेचे आरोप केला आहे की, तिने त्याला पैसे दिले नाही तर 1 ते 10 ऑगस्टदरम्यान तो तिला धमकी देत होता. त्याचवेळी त्याने व्हाट्सअपवर तिला मॅसेज केले. पीडितेने जेव्हा त्याचा नंबर ब्लॉककेला तेव्हा त्याने वेगवेगळ्या नंबरवरून मॅसेज पाठवले.
या प्रकरणात समोर आलेली नवी माहिती म्हणजे, आरोपीने पीडितेच्या नावाने एक बनावट अकाऊंटदेखिल तयार केले होते. त्यानंतर मुंबईत एका तरुणाला तो आयडी विकला. महिलेकडून पैसे उकळण्याचा प्रकार अनेकदिवस सुरू होता. पोलिस या प्रकरणी मुंबईतील सहआरोपीलाही अटक करणार आहेत. पोलिस मुख्य आरोपीचा शोध घेत असून तपासासाठी पोलिस अजमेरलाही जाणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.