आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्यात यशस्वी आणि सुखी करणारे आचार्य चाण्यक्यांचे प्रभावी विचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आचार्य चाणक्य जीवन दर्शनचे ज्ञाता होते. त्यांनी केवळ शासन आणि इकॉनॉमी संदर्भातच ज्ञान दिले नसून आहे अनेक नीती सांगितल्या आहेत ज्यामुळे आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला चाणक्यांचे असेच 10 दमदार विचार सांगत आहोत.


- भाग्य अशा लोकांच्याच सोबत असते, जे संकट काळातही लक्ष्य पूर्ण करण्याच्या निश्चयावर ठाम असतात.


- स्वतःमधील कमजोरी कधीही स्वतः इतरांसमोर उघड करू नका.


- एखादे काम सुरु केल्यानंतर अपयशाच्या भीतीने ते काम अर्धवट सोडू नका.


- कोणतेही काम सुरु करण्यापूर्वी स्वतःला तीन प्रश्न विचारा- मी काय करत आहे, याचे परिणाम काय होतील आणि मी यामध्ये यशस्वी होईल की नाही? या प्रश्नांची उत्तरे मिळाली तरच पुढे जा.


- तुम्ही एखाद्या कामाची केलेली योजना कधीही उघड करू नका. हे राहें नेहमी कायम ठेवा.


- सिंहाकडून शिका- जे काही करायचे आहे ते मन लावून आणि जोरदार पद्धतीने करा.


- जो व्यक्ती ताकद नसूनही मनाने हार मान्य करत नाही त्याला कोणीही पराभूत करू शकत नाही.


- कोणतेही काम उद्यावर ढकलू नका. पुढच्या क्षणी काय होणार आहे, हे कोणालाच माहिती नसते.


- जोपर्यंत तुम्ही आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावण्याचे धाडस करणार नाहीत तोपर्यंत प्रतिस्पर्धीला हरवणे तुमच्यासाठी शक्य नाही.

बातम्या आणखी आहेत...