आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीती : अन्न आणि धन संदर्भात असंतुष्ट राहू नये, अन्यथा सुख-शांती नष्ट होते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या लोकांच्या जीवनात असंतोष असतो, त्यांना कधीही सुख प्राप्त होत नाही. असे लोक नेहमी अडचणींनी घेरलेले राहतात आणि कामामध्ये अपयशी होतात. आपल्याकडे ज्या वस्तू आणि सुख-सुविधा असतील आपण त्यामध्ये संतुष्ट राहावे. आचार्य चाणक्य यांनी अशा तीन परिस्थितींविषयी सांगितले आहे, ज्यामध्ये व्यक्तीने नेहमी संतुष्ट राहावे.

चाणक्य नीती 
संतोषषस्त्रिषु कर्तव्य: स्वदारे भोजने धने।
त्रिषु चैव न कर्तव्यो अध्ययने जपदानयो:।।
हा चाणक्य नीती ग्रंथांमधील 13 व्या अध्यायातील 19 वा श्लोक आहे. 

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, पत्नी सुंदर नसेल तरीही व्यक्तीने संतोष करावा. लग्नानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये इतर स्त्रीकडे आकर्षित होऊ नये, कारण या गोष्टीमुळे विविध अडचणी सुरु होतात.

अन्न कसेही भेटले तरी प्रसन्नतेने ग्रहण करावे. कधीच अन्नाला नाव ठेवू नये आणि ताटामध्ये उष्टे टाकू नये. व्यक्तीकडे जेवढा पैसा असेल त्याचे जेवढे उत्पन्न असेल त्यामध्येच आनंदी राहावे. उत्पन्नपेक्षा जास्त खर्च करू नये. इतरांच्या सुख-सुविधा पाहून कधीही ईर्ष्या करू नये. असे वागले तरच सुख लागेल अन्यथा जीवनात असलेली सुख-शांतीही नष्ट होऊ शकते.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार अध्ययन, दान आणि जप या तिन्ही गोष्टींमध्ये संतोष करू नये. हे तिन्ही कर्म तुम्ही जेवढे जास्त कराल तुमचे पुण्य तेवढे वाढत जाईल. जेवढे जास्त अध्ययन कराल तेवढेच ज्ञान वाढेल. ज्ञानी व्यक्ती जीवनात नेहमी सुखी राहतो. दान करण्यातही कधी संतोष बाळगू नये. दान केल्याने इतरांची मदत होते आणि आपल्याला पुण्य मिळते. मंत्र जप करण्यातही संतोष करू नये. मंत्राचा जेवढा जास्त जप कराल तो मंत्र सिद्ध होण्याची शक्यताही तेवढीच वाढते.

बातम्या आणखी आहेत...