आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आचार्य निर्भयसागर म्हणाले, हनुमान जैन होते...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- जैन संत आचार्य निर्भयसागर यांनी रविवारी येथे सांगितले, जैन धर्मातील अनेक ग्रंथांत हनुमान जैन असल्याचा उल्लेख आहे. निर्भयसागर म्हणाले, जैन तत्त्वात म्हटले आहे की, हनुमान कामदेव होते. जैन धर्मात २४ कामदेव असतात. जैन तत्त्वानुसार चक्रवर्ती, नारायण, प्रतिनारायण, बलदेव, वासुदेव, कामदेव व तीर्थंकराचे माता-पिता हे सर्व क्षत्रिय होते. जे महापुरुष असतात त्यांची संख्या १६९ इतकी होती. यात हनुमानाचे नाव आहे आणि कामदेव असल्याने ते क्षत्रिय होते. ते म्हणाले, हनुमान यांनी वैराग्य अवस्था धारण केली. त्यानंतर ते जंगलात गेल्यानंतर त्यांनी दीक्षा घेतली.

 

हनुमान यांनी ज्ञानावर अज्ञानाचा पडलेला पडदा दूर केला. त्यांनी वैराग्य धारण केले व कैवल्य ज्ञान प्राप्त केले. हनुमानाने प्रथम क्षत्रिय अवस्था, त्यानंतर वैराग्य अवस्था प्राप्त केली. त्यानंतर त्यांना वीतराग अवस्था मिळाली. त्यानंतर जैन तत्त्वानुसार ते अरिहंत बनले. 

 

देवांची विभागणी जातींत करणे चुकीचेच : राजभर 
'भगवान हनुमान हे दलित होते,' या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याला त्यांच्याच मंत्रिमंडळातील मागास वर्गांसाठीचे कल्याणमंत्री ओमप्रकाश राजभर यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. देवांची विभागणी जातींत करणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत राजभर यांनी मुख्यमंत्र्यांना 'घरचा आहेर' दिला आहे. 

 

शामली येथे रविवारी जाहीर सभेत बोलताना राजभर यांनी स्वत:च्याच सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, अशी वक्तव्ये करून वाद निर्माण करणे योग्य ठरणार नाही. देवांची विभागणी जातींत करणे चुकीचे आहे. या वादामुळे दलित समुदाय हनुमानांची मंदिरे ताब्यात घेण्याची मागणी करत आहे. कश्यप समुदायाला २७ टक्के आरक्षण न देण्याच्या निर्णयावरूनही राजभर यांनी राज्य सरकारवर टीका केली. तर भीम आर्मीने हनुमान मंदिरे ताब्यात घेण्याचे आवाहन केले होते. 

बातम्या आणखी आहेत...