आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अछूत कन्या ते फँड्री...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दलित प्रश्नाला भिडण्याचे धाडस हिमांशू रायपासून नागराज मंजुळेपर्यंत अनेक दिग्दर्शकांनी दाखवले आहे. स्वातंत्र्यापूर्वी १९३६ मध्ये फ्रान्झ ऑस्टेन, हिमांशू राय, निरंजन पाल या त्रिकुटाचा “अछूत कन्या’ आला. आपल्या सवर्ण प्रियकराचा आणि पतीचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान करणारी कस्तुरी नावाची अछूत कन्या देविका राणीने यात चितारली. खुद्द महात्मा गांधींनी या चित्रपटाचे कौतुक केले. अजून दुसरा पुरस्कार कोणता हवा ? मग १९५९ मध्ये “सुजाता’ आला. १९७४ ला श्याम बेनेगल यांचा “अंकुर’ आला. यामध्ये दलित लक्ष्मीच्या नवऱ्याला चाबकाने मारणाऱ्या जमीनदाराच्या तावदानावर रागारागाने दगड मारून ते तावदान फोडणारा ८- १० वर्षांचा पोरगा शेवटच्या प्रसंगात आपल्याला दिसतो. पण काच फोडल्यावर तो पोरगा पळून जातो. २०११ मध्ये आलेल्या नागराज मंजुळेच्या “फँड्री’तला जब्या अख्ख्या व्यवस्थेलाच शिवीगाळ करत दगड मारताना दिसतो. “अछूत कन्या’मधील त्याग, “सुजाता’मधील सहर्ष स्वीकारानंतर “अंकुर’मधील अर्धा कच्चा संघर्ष “फँड्री’मध्ये अधिक नेमका आणि टोकदार होताना दिसतो. दलित प्रश्नाचे बदलते रूप वेगवेगळ्या टप्प्यांवरील या चित्रपटांमधून आपल्याला जाणवत राहते. १९३६ ते १९७४ या काळांमधील कस्तुरी, सुजाता आणि लक्ष्मीपेक्षा आजचा जब्या अधिक हतबल आणि वैफल्यग्रस्त दिसावा, हे खरे म्हणजे समाज म्हणून आपले अपयश आहे. 

बातम्या आणखी आहेत...