आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहैदराबाद - पाच वर्षीय आशमन तनेजाचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये दाखल झाले आहे. सगल एक तासाच्या फुल कॉन्टॅक्ट 'ना स्ट्राइक'साठी हा सन्मान देण्यात आला आहे. आशमन यूएसए वर्ल्ड ओपन तायक्वांदो रौप्य पदक विजेता आहे. तसेच त्याच्या नावे आणखी एक गिनीज वर्ल्ड आहे.
आशमनचे पिता आशिष तनेजाने सांगितले की, इतक्या कमी वयाच हा सन्मान मिळवण्यासाठी आशमनने कठोर मेहनत आणि अभ्यास केला. त्याने एका तासात न थांबता यशस्वीरित्या 1200 हून अधिक नी स्ट्राइक करून सर्वाना प्रभावित केले. तो त्याच्या बहिणीकडून प्रेरित आहे. ती देखील तायक्वांदो खेळाडून आहे. आशमनने तिच्याकडूनच प्रशिक्षण घेतले होते. आशमनने सांगितले की, जेव्हा माझ्या बहिणीने दोन जागतिक विक्रम बनवले तेव्हा मी सुद्धा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड जिंकण्याचा निश्चय केला होता. माझी बहीण माझी प्रेरणा आणि शिक्षक दोन्ही आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.