Home | Maharashtra | Pune | Acid attack on boy in Pune

तरुणावर अॅसिडचा हल्ला, दोन इमारतींच्या पोकळीत पडून हल्लेखोराचा मृत्यू

प्रतिनिधी | Update - Apr 17, 2019, 10:04 AM IST

हल्लेखोर पळत असताना पोलिस दाखल झाले

  • Acid attack on boy in Pune

    पुणे- पुण्यात तरुणावर अज्ञाताने अचानक अॅसिड फेकले. तर, तिथून पळ काढताना इमारतीच्या पोकळीत अडकून हल्लेखोर ठार झाला. जखमी रोहित खरातवर (२३, सदाशिव पेठ, पुणे) पूना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उशीरा रात्रीपर्यंत आरोपीची ओळख पटली नव्हती.

    मंगळवारी रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास रोहित टिळक सभागृहाजवळील एका इमारतीच्या बोळीत मैत्रिणीसोबत बोलत होता. तितक्यात अज्ञाताने त्याच्यावर अॅसिड टाकले. हल्लेखोर पळत असताना पोलिस दाखल झाले. त्या वेळी पोलिस व हल्लेखोरात चकमक उडाली. त्यामुळे हल्लेखोर इमारतीच्या डक्टमध्ये उतरला. परंतू उतरताना त्याच्या डोक्याला मार लागला आणि त्यातच तो ठार झाला.

Trending