आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दार उघडताच युवतीच्या अंगावर फेकले 5 लिटर अॅसिड, आरोपी फोन करून म्हणाला- बघितला नकार देण्याचा परिणाम...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधियाना- 25 वर्षीय युवतीवर अॅसिड फेकल्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी तिच्या मोबाईलवर कॉल आला. युवतीच्या वडिलांना फोन करून धमकी देण्यात आली. फोनवरिल व्यक्ति म्हणाला- मुलगी पाहिजे का सोयरिक. पाहिला मला नकार देण्याचा परिणाम. या कॉलमुळे घाबरलेल्या परिवाराने लगेच याची सुचना पोलिसांना दिली. पोलिसांनी कॉलची लोकेशन चेक केली तेव्हा ती ट्रांसपोर्ट नगर येथे मिळाली. त्यानंतरपासून नंबर बंद आहे. त्यामुळे आरोपीचा पत्ता लागला नाहीये. पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज लागले आहे ज्यात एक व्यक्ति दिसत आहे. पोलिस त्याचा तपास घेत आहेत. काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिस त्यांची चौकशी करत आहे.

 

या घटनेनंतर परिसरात दहशतिचे वातावरण निर्णान झाले आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीत युवतीच्या वडिलांनी त्यांच्या एका ओळखिच्या व्यक्तिच्या मुलाचे नाव घेतले आहे. दोन महिन्यापुर्वी त्या मुलाने त्यांच्या मुलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती पण मुलीने नकार दिला होता. त्यानंतर त्याने फोनवरून धमकी दिली होती की, लग्न नाही केले तर परिणाम खुप वाईट होतील.

 

होणारा नवरा म्हणाला लग्न करेल तर याच मुलीसोबत
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्याला या घटनेची माहिती मिळाली की लगेच तो रूग्णालयात आला. तो म्हणाला की, जे व्हायचे होते ते झाले, आता आपण काही करू शकत नाहीत. पण लग्न करेन तर हिच्यासोबतच करेल. जोपर्यंत ती ठिक होत नाही तोपर्यंत मी तिची काळजी घेईल.


मुलीची प्रकृती स्थिर डॉ. जयंती
पिडीत मुलीवर टॉयलेटमध्ये वापरले जाणारे अॅसिड फेकण्यात आले आहे. त्यात ती 25 ते 30% भाजली असून तिची प्रकृती सध्या स्टेबल आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...