आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ludhiana News: Acid Attack On Girl On Refusal For Marriage, Accused Got The Idea From A Tv Serial

दीदी-दीदी म्हणायचा पण एकतर्फी करायचा प्रेम, तरुणीने लग्नाला दिला होता नकार; आरोपी म्हणाला- म्हणून मालिका पाहून फेकले होते अॅसिड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधियाना - 15 नोव्हेंबर रोजी तरुणीवर अॅसिड हल्ला करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा तरुणीचा शेजारी रघुबीर सिंह ऊर्फ लक्की (27) आहे. आरोपी म्हणाला की, तो 12 दिवस घराच्या आसपास फिरत होता, पण पोलिसांनी त्याचा लुधियानासह अनेक जिल्ह्यांमध्ये शोध घेतला. आरोपीच्या म्हणण्यानुसार, टीव्ही सीरियलमध्ये अॅसिड अटॅक पाहून हल्ला केला. फॅक्टरीत अॅसिड पाहून तेथून त्याने 5 लीटरच्या कॅनमध्ये एक लीटर अॅसिड भरून आणले. आरोपीने घटनेच्या दिवशी काळ्या रंगाची कॅप आणि तोंडावर काळा कपडा बांधला होता.

 

आरोपी तरुणीवर एकतर्फी प्रेम करायचा...
एसीपी पवनजीत म्हणाले की, आरोपी रघुबीरला पोलिस चौकशीसाठी घेऊन आले होते, परंतु तो ठाण्यातून पळून गेला होता. आरोपी म्हणाला की, 12 दिवस इथेतिथे फिरत होता. अनेकदा धार्मिक स्थळांवर महाप्रसादाचे जेवण केले. पीडितेच्या कुटुंबाच्या मते, आरोपीसोबत त्याचे 2-3 मित्र होते, परंतु पोलिसांना अद्यापही त्यांचा काहीच पत्ता लागलेला नाही. तपास अधिकारी म्हणाले की, मागच्या 5-6 महिन्यांपासून तरुणीवर एकतर्फी प्रेम करू लागला होता. परंतु सर्वांसमोर तो तिला दीदी-दीदी म्हणायचा. त्याने 2 वेळा तरुणीला लग्नासाठी घरच्यांशी बोलण्यासाठी सांगितले. परंतु तरुणीने त्याला भाऊ मानत असल्याचे सांगून विषय बंद केला. मग तिचा साखरपुडा होत असल्याचे कळल्यावर त्याला सहन झाले नाही. यामुळे त्याने ती आपली नाही, तर कुणाचीच होऊ देणार नाही असा विचार करून तिच्यावर हल्ल्याचा कट रचला.

 

पीडिता म्हणाली, आरोपीला फासावर लटकवा
- पीडिता म्हणाली, ''मी दररोज माझा चेहरा आरशात पाहत होते, कारण लग्न होणार होते. परंतु जेव्हापासून बहीण म्हणणाऱ्या नराधमाने माझा चेहरा खराब केला. मी घरातील सर्व आरशांवर पडदा टाकला आहे. कारण आता माझा चेहरा पाहायलाही मी भीते. पोलिसांनी आरोपीला पकडले, आता त्याला फासावर लटकवले पाहिजे.  

 

 

 

बातम्या आणखी आहेत...