आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅसिड अटॅक : जिच्यावर मनापासून प्रेम केले, लग्न करायचे होते, तिलाच विद्रूप करण्यासाठी त्याने दिली सुपारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाला - हरियाणातील 4 ऑक्टोबरला घडलेल्या महिलेवर अॅसिड फेकण्याच्या घटनेतील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पण मुख्य आरोपी अजूनही फरार आहे. पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची कोठडीत रवानगी करण्यात आळी आहे. दोन तरुणांनी येथील 31 वर्षीय महिलेच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले होते. त्यामुळे तिचा चेहरा, पोट, हात-पाय हे 40 ते 50 टक्के भाजले होते. 


पोलिसांनी अॅसिड फेकणारा अरुण आणि त्याला मदत करणारा नितीन यांना अटक केली आहे. तर मास्टरमाइंड मोती अंडरग्राउंड आहे. मोती पीडितेच्या आत्याच्या नणंदेचा मुलगा आहे. त्याला पीडित महिलेशी लग्न करायचे. पण तिने लग्नाचा प्रस्ताव फेटाळल्याने तो प्रचंड रागात होता. मोती दोन्ही आरोपींपैकी एकाला थ्री व्हीलर तर दुसऱ्याला बाईक देण्याचे आमीष दाखवले होते. 

 

कामगार विभागात काम करणारी पीडित महिला अंबाला सिटीच्या सेक्टर-7 मध्ये भाड्याने राहते. 4 ऑक्टोबरच्या सायंकाळी 5:30 वाजता ती घराकडे पायी चालली होती. त्याचवेळी बाइकवर आलेल्या आरोपींनी अॅसिडने भरलेला जग तिच्यावर फेकला होता. नितीन 30 सप्टेंबरलाही अॅसिड फेकण्यासाठी आला होता, पण त्याला तेव्हा ते शक्य झाले. 

बातम्या आणखी आहेत...