Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Action against those who burn the copy of Indian Constitution at Jantar Mantar

जंतरमंतर येथे भारतीय संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर कारवाई करावी, संभाजी ब्रिगेड तसेच बसपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

प्रतिनिधी | Update - Aug 12, 2018, 12:33 PM IST

दिल्ली जंतरमंतर येथे ९ ऑगस्ट रोजी भारतीय संविधानाची प्रत जाळणाऱ्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपशब्द वापरणाऱ्यास त्वर

 • Action against those who burn the copy of Indian Constitution at Jantar Mantar

  सोलापूर - दिल्ली जंतरमंतर येथे ९ ऑगस्ट रोजी भारतीय संविधानाची प्रत जाळणाऱ्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपशब्द वापरणाऱ्यास त्वरित अटक करून कठोर शासन करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेडचे शाम कदम आणि शहर बसपच्या वतीने नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.


  बसपने दिलेल्या निवेदनात दिल्ली येथे जंतरमंतरवर काही देशद्रोही लोकांनी डॉ. आंबेडकर यांना अपशब्द वापरून भारतीय संविधानाची प्रत जाळून देशद्रोही कृती केलेली आहे. असे कृत्य करणारे श्रीनिवास पांडे, संजय शर्मा, दीपक गौर, अनुप दुबे, कृष्णा मोहनराय, आशितोष झा, संतोष शुक्ला, कामिनी झा व त्यांच्या समर्थकांना अटक करावी, त्यांच्यावर कारवाई करावी व तसेच बंदोबस्तास असलेल्या पोलिसांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणी केली आहे.

  या प्रकरणी बहुजन समाज पार्टी फिर्यादी होण्यास तयार आहे, आमची फिर्याद दाखल करून घेण्यास पोलिस प्रशासन आदेश व्हावे अशी मागणीही केली आहे. यावेळी प्रदेश सचिव बबलू गायकवाड, देवा उघडे, प्रवीण कांबळे, सुहास सुरवसे, राहुल सर्वगोड, अमर साळवे, बाळासाहेब थोरात, चंद्रशेखर गायगवळी, जनार्दन शिंदे, अशोक जानराव, शीलवंत काळे आदी उपस्थित होते.

  संभाजी ब्रिगेडचे निवेदन
  जंतरमंतर, दिल्ली येथे संविधानाची प्रत जाळल्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेड सोलापूरचे शहराध्यक्ष श्याम कदम, मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, उत्तम नवगिरे, अविनाश फडतरे, सीताराम बाबर, रोहित कसबे, अभि उगाडे, फिरोज सय्यद, समीउल्ला शेख, कॅप्टन शफी, रोहन माने, दौला कुमठे, निजामउद्दिन शेख आदी उपस्थित होते.

Trending